उज्वल केसकर यांनी भाजपाला बिनकामाची सूचना करण्याची गरज नाही – धनंजय  जाधव 

पुणे-  भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक उज्वल केसकर (Bharatiya Janata Party leader Ujwal Keskar) यांनी नुकतेच  पुणे भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक (Pune BJP City President Jagdish Mulik) यांना काढून नवीन नेतृत्वाला संधी द्यावी अशी मागणी केली होती. या मागणीवरून  शहरभर चांगलीच उलटसुलट चर्चा झाली. यातच आता भाजप प्रवक्ते धनंजय जाधव (BJP spokesperson Dhananjay Jadhav) यांनी  प्रसिद्धीपत्रक काढून यावर भाष्य केले आहे.

या प्रसिद्धीपत्रकात जाधव  म्हणाले, भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या नवीन शहर अध्यक्ष शहर अध्यक्ष म्हणून जगदीश मुळीक यांचीच नियुक्ती होईल अशी संभावना जास्त आहे. कोरोनाच्या महामारी मध्ये पुणे शहरांमध्ये भारतीय जनता पार्टीने जगदीश मुळीक त्यांच्या नेतृत्वाखाली अतिशय चांगलं काम केलं. खासदार, आमदार, माजी आमदार, नगरसेवक, माजी नगरसेवक, मंडल अध्यक्ष, प्रभाग अध्यक्ष, शहराची संपूर्ण कार्यकारणीने आणि कार्यकर्त्यांच्या ताकतीवर कोरोना साथीत अतिशय चांगलं काम केल्यामुळे नागरिकांना खूप च मदत झाली. इतर कोणत्याही राजकीय पक्षाचे कार्यकर्ते रस्त्यावर नसताना भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता, नेता हा लोकांच्या साठी औषधे, जीवनावश्यक वस्तू वाटप करत होता. ज्येष्ठ नागरिक असो, महिला असो, युवक असो, युवती असो किंवा कोरोना बाधित पेशंट असो या सर्वांना मदत करण्याचं काम शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वाखाली पुणे शहरात होत होते.

भारतीय जनता पार्टीच्या आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये कधी नव्हे तेवढी विविध जाती धर्माच्या, विविध घटकातील लोकांना नेतृत्व करण्याची संधी जगदीश मुळीक यांनी मिळवून दिली. भारतीय जनता पार्टीच्या शहरात विविध क्षेत्रातल्या आघाड्या करून ७०० ते ८०० पदाधिकाऱ्यांची कार्यकारणी करण्यात आली आणि विविध दुर्लक्षित घटकांना यामध्ये समाविष्ट करण्यात आले.

भारतीय जनता पासून पार्टी पासून दुरावलेल्या कार्यकर्त्याला पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीमध्ये आणून त्याचं पुनर्वसन करण्याचं काम त्यांनी केलं. तोंडात साखर, डोक्यावर बर्फ आणि पायाला भिंगरी या युक्ती प्रमाणे पुणे शहर ढवळून काढलं. प्रत्येक मतदार संघाच्या, आघाड्यांच्या बैठकांना अनेक वेळा उपस्थित राहून केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या सर्व योजना मार्गी लावण्याचे काम त्यांनी केले, शहरामध्ये होणारे पक्षाचे आंदोलन असो किंवा पक्षाचा मेळावा असो आपल्या नेतृत्व गुणांमुळे यशस्वी करण्याचे काम त्यांनी केले आहे.

आत्तापर्यंत एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पार्टीचं पूर्णवेळ काम करणारा अध्यक्ष हा पुणे शहराला मिळाला नव्हता. तो नेता जगदीश मुळीक यांच्या रूपात भारतीय जनता पार्टी ला अध्यक्ष म्हणून लाभला.प्रत्येक कार्यकर्त्यांशी संवाद साधून पार्टी वाढवण्याचे काम ते करत आहेत. भारतीय जनता पार्टी चे अद्यावत आणि भव्य पुणे शहर कार्यालय त्यांनी सुरू केलं. भाजपचा वर्धापन दिन असो किंवा दिवाळी फराळाचा कार्यक्रम असो हजारो लोकांची उपस्तिथी पहिल्यांदा च पाहिली. एवढेच नाही तर शहराच्या नूतन शहर कार्यालयाच्या उदघाटन प्रसंगी किमान २० हजार कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

सत्ताधारी पार्टीचा शहराध्यक्ष या नात्याने पुणे महानगरपालिके मध्ये ढवळाढवळ न करता योग्य ते निर्णय व्हावे, तसेच पुणे शहराच्या विकासासाठी कटीबद्ध म्हणून महानगरपालिकेमध्ये अधिकारी आणि नगरसेवक नगरसेवकांच्या बैठका येऊन अनेक योजना मार्गी लावण्याचे काम केलं. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलेल्या भ्रष्टाचारा विरुद्ध अनेक यशस्वी आंदोलने केली. भाजपा माजी केंद्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शाह यांची गणेश कला क्रीडा येथे लोकसभा बूथ प्रमुखांना मार्गदर्शन सभा यशस्वी केली.नुकत्याच झालेल्या  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सिनेट निवडणूकित सुद्धा पार्टीला चांगले यश मिळाले.

पुणे मनपा मध्ये किरीट सोमय्या यांना शिव सेनेच्या कार्यकर्त्या कडून झालेली धक्काबुक्की असो, पार्टीचे प्रवक्ते आंबेकर यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या कडून झालेली मारहाण असो या विरुद्ध विरोधकांना त्याच पद्धतीने उत्तर देण्याचे काम शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांच्याच काळात झाले. पार्टीच्या कार्यकर्त्याने मार खाण्याचे दिवस गेले. आता पार्टीचा कार्यकर्ता मार खाणार नाही म्हणून कार्यकर्त्यांचे समर्थन ही केले. पार्टीच्या सर्व सामान्य, चांगले काम करणाऱ्या कार्यकर्त्याला ताकत देण्याचे काम जगदीश मुळीक करत आहेत.

पुणे लोकसभा निवडणूक अजून खूप लांब आहे, पण वडगाव शेरी तील मुळीक यांच्या सारखा उमेदवार भाजपा कडून लोकसभेला आला तर पुणे शहरातील मोठ्या मतदान तर होईलच पण वडगाव शेरी मतदार संघातून ही मोठे मताधिक्य मिळेल. जगदीश मुळीक यांच्या बाबत पक्षश्रेष्टी चांगला निर्णय घेतीलच. जगदीश मुळीक यांच्या कामाचा जोर आणि नेतृत्वाचा विचार करता जगदीश मुळीक यांना पुन्हा शहर अध्यक्ष पदाची माळ गळ्यात पडू शकते.

राहिला विषय येणारी पुणे महानगरपालिका निवडणूक तर उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस, प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, खासदार गिरीशभाऊ बापट, खासदार प्रकाश जावडेकर शहरातील सर्व आमदार यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांना बरोबर घेउन चालणारे पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या सारख्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा शंभर पेक्षा जास्त नगरसेवक निवडून येतील आणि पुन्हा भारतीय जनता पार्टीचा महापौर होईल हा विश्वास आहे. जगदीश मुळीक शहर अध्यक्ष म्हणून नक्कीच हा विजय संपादन करतील.

त्यामुळे पुणे शहर भारतीय जनता पार्टीच्या दुधात मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न कोणीही करू नये.उलट जगदीश मुळीक यांचा कामाचा धडाका, धाडसी नेतृत्वगुण, निर्णय घेणारा नेता, कार्यक्षमता पाहता, त्यांचे वय पाहता पुणे शहराचा नेता म्हणून पुन्हा एकदा पुणे शहर अध्यक्ष पदी जगदीश मुळीक यांची नियुक्ती करणे उचित होईल. उज्वलजी, भाजपा पुणे शहरात कोणतेही गटबाजी नाही पण काही अल्पसंतुष्ट लोकं गटबाजी असल्याचे लोकांना भासवतात. . भारतीय जनता पार्टी कडे अनेक निवडणूक तज्ञ आहेत आपल्या सारख्या स्वयंघोषित नेता आणि निवडणूक विश्लेषकाची गरज नक्कीच नाही.मुळातच उज्वल केसकर हे भारतीय जनता पार्टीत आहेत की नाही हाच प्रश्न आहे.असं देखील जाधव यांनी म्हटलं आहे.