Dharashiv LokSabha | धाराशिवमधून अर्चना पाटील आणि ओमराजे निंबाळकर यांच्यासह ५० उमेदवारी अर्ज दाखल

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Dharashiv LokSabha) महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील (Archana Patil) आणि महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्या प्रमुख लढत होत आहे. अर्चना पाटील आणि ओमराजे निंबाळकर या दोन्हीही उमेदवारी अर्ज सादर केले आहेत. मात्र त्यांच्यासह अन्य ३६ उमेदवारांनी एकूण ५० उमेदवारी अर्ज दाखल केल्याची माहिती निवडणुक निर्णय अधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी दिली आहे.

धाराशिव लोकसभेसाठी (Dharashiv LokSabha) शुक्रवार हा उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. यानुसार शुक्रवारपर्यंत ३६ उमेदवारांनी एकूण ५० नामनिर्देशपत्र दाखल केले आहेत. यामध्ये अर्चना पाटील, ओमराजे निंबाळकर यांच्यासह,  आर्यनराजे शिंदे (अपक्ष), राजकुमार पाटील (अपक्ष), संजयकुमार वाघमारे (बीएसपी), विलास घाडगे (अपक्ष), शामराव पवार (समनक जनता पार्टी), नवनाथ उपळेकर (अपक्ष), ॲड.विश्वजीत शिंदे (आदर्श संग्राम पार्टी), हनुमंत बोंदर (अपक्ष), योगीराज तांबे (अपक्ष ) यांनी अर्ज सादर केले आहेत.

त्याचबरोबर उमाजी गायकवाड (अपक्ष), नेताजी गोरे (अपक्ष), समीरसिंह साळवी (अपक्ष), काकासाहेब खोत (अपक्ष), बाळकृष्ण शिंदे (अपक्ष), भाऊसाहेब आंधळकर (अपक्ष), सोमनाथ कांबळे (अपक्ष), गोवर्धन निंबाळकर (अपक्ष), काका कांबळे (अपक्ष), शेख नौशाद इकबाल (स्वराज्य शक्ती सेना पार्टी), राम शेंडगे (अपक्ष), नितीन मोरे (अपक्ष), अरुण जाधवर (ओबीसी बहुजन पार्टी), सिद्दीक इब्राहीम बोडीवाले (एआयएमआयएम), वर्षा कांबळे (अपक्ष), भाऊसाहेब बेलुरे (अपक्ष), नितीन गायकवाड (अपक्ष) या उमेदवारांचा समावेश आहे. या २७ उमेदवारांनी ३३ अर्ज दाखल केले आहेत.

दरम्यान, राजकुमार पाटील, अर्चना पाटील, नेताजी गोरे व ॲड. विश्वजीत शिंदे या उमेदवारांनी दोन व तीन नामांकन अर्ज दाखल केले आहेत. शेवटच्या दिवसअखेर ३६ उमेदवारांनी एकूण ५० नामनिर्देशनपत्र दाखल केले आहेत. शेवटच्या दिवशी ६ जाणांनी २० अर्जाची खरेदी केलीय आहे. त्यामुळे एकूम ७७ जणांनी १७५ अर्ज खरेदी केले आहेत.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Archana Patil | अर्चना पाटील यांच्या विजयासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार करतायत सर्वतोपरी प्रयत्न

Omraje Nimbalkar Vs Archana Patil: धाराशिवचे उमेदवार ओमराजे निंबाळकर व अर्चना पाटील यांची संपत्ती किती?

Uddhav Thackeray | फडणवीस म्हणाले होते आदित्यला मुख्यमंत्रिपदासाठी तयार करतो अन् मी दिल्लीला जातो; ठाकरेंचा दावा