Ramdas Kadam | सुनिल तटकरे यांना सर्वाधिक मताधिक्य देऊन निवडून आणा

Ramdas Kadam | रायगड मतदारसंघातील उमेदवार सुनिल तटकरे यांना सर्वाधिक मताधिक्य देऊन निवडून आणायचे आहे असे आवाहन माजी मंत्री रामदास कदम यांनी मंडणगड येथे केले. अनंत गीते यांच्या दोन लोकसभा निवडणुकीचा खर्च मी केला आहे. मात्र या उपकाराची परतफेड मला गुहागर मतदारसंघात पाडून केली. दुसर्‍याचा खड्डा खणण्याचे काम करणार्‍या अनंत गीते यांचे डिपॉझिट जप्त करा असे सांगतानाच पाठीत खंजीर खुपणारा आणि कोकणाला लागलेला हा काळा डाग धुवून टाका असे आवाहनही रामदास कदम यांनी केले.

सुनिल तटकरे तुम्ही प्रचंड मताधिक्याने विजयी होणार आणि केंद्रात मंत्री होणार हे नक्की आहे. मात्र मंत्री झाल्यावर माझ्या रायगड जिल्हयात विकास योजना आणा असा शब्द रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी सुनिल तटकरे यांच्याकडून घेतला.

उद्योग गुजरातला गेले अशी बोंब ठोकत आहेत. पण खेडमध्ये येणारा उद्योग याच उध्दव ठाकरे यांनी थांबवला परंतु तेच काम उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ४० दिवसात ७५ एकर जमीन आणि मंजुरी देत केले यामुळे हजारो तरुणांना रोजगार उपलब्ध होणार आहे असेही रामदास कदम म्हणाले.

या जाहीर सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार सुनिल तटकरे, माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम, उद्योगमंत्री आणि रायगड जिल्हयाचे पालकमंत्री उदय सामंत, दापोली – मंडणगडचे आमदार योगेश कदम, माजी आमदार सुर्यकांत दळवी, आरपीआय जिल्हा सरचिटणीस आदेश मर्चंडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष केदार साठे, प्रकाश शिगवण आदींसह महायुतीचे तालुकाध्यक्ष, तालुकाप्रमुख आणि पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Archana Patil | अर्चना पाटील यांच्या विजयासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार करतायत सर्वतोपरी प्रयत्न

Omraje Nimbalkar Vs Archana Patil: धाराशिवचे उमेदवार ओमराजे निंबाळकर व अर्चना पाटील यांची संपत्ती किती?

Uddhav Thackeray | फडणवीस म्हणाले होते आदित्यला मुख्यमंत्रिपदासाठी तयार करतो अन् मी दिल्लीला जातो; ठाकरेंचा दावा