Dheeraj Ghate | आज खऱ्या अर्थाने पुण्याने दिवाळी साजरी केली – धीरज घाटे

Dheeraj Ghate :- पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली, ह्याचा मनस्वी आनंद होत आहे. पुणेकरांसाठी आज दुग्धशर्करा योग आहे. पुण्याचे नवनिर्वाचित खासदार मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) हे सुद्धा मंत्री पदाची शपथ घेत आहेत, याचा पुणेकर म्हणून एक नक्कीच अभिमानाचा क्षण आहे. आज पुणेकरांनी खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी केली आहे. मुरलीधर मोहोळ यांच्या रूपाने पुण्याचे विकासपर्व सुरू झाले आहे. पुण्यात विविध योजना केंद्रातून मंजूर करून पुणेकरांचे जीवन मोहोळ सुखदायी करतील हा विश्वास आहे, असे प्रतिपादन शहराध्यक्ष धीरज घाटे (Dheeraj Ghate) यांनी केले.

स प महाविद्यालय चौक या ठिकाणी भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या वतीने जल्लोष करण्यात आला. यावेळी १०० किलो जिलबीचे वाटप घाटे यांच्या हस्ते पुणेकरांना करण्यात आले.

यावेळी शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्यासह माजी नगरसेवक अजय खेडेकर, सम्राट थोरात दिलीप काळोखे, मनीषा घाटे, धनंजय जाधव, पुष्कर तुळजापूरकर, हेमंत लेले आदी उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या-

Naseem Khan : महाराष्ट्रात मराठा, मुस्लिम व धनगर समाजाला त्वरित आरक्षण द्या – नसीम खान

Shrikant Shinde : श्रीकांत शिंदे यांना मंत्रिपद द्या, शिवसेना नेते आणि कार्यकर्त्यांनी व्यक्त केली इच्छा

“अयोध्येतील भव्य मंदिरासोबतच आसपासच्या शहरवासीयांचे…”, भाजपच्या पराभवावर ‘शक्तिमान’ची लक्षवेधी प्रतिक्रिया