Vikram Kale | अर्चना ताईंना लीड मिळवून देण्यासाठी मोठ्या संख्येने मंतदान करा, आमदार विक्रम काळेंचे आवाहन

Vikram Kale | धाराशिव लोकसभा मंतसंघातून आज माहायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील (Archana Patil) यांचा उमेदवारी अर्ज आज भरण्यात आला. यावेळी राणाजगजीतसिंग पाटील, अर्चना पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार विक्रम काळे आदी उपस्थित होते. यावेळी आयोजित प्रचार रॅलीमध्ये आमदार विक्रम काळे यांनी अर्चना पाटील यांना विजयी करण्यासाठी जनतेला आवाहन केले.

आमदार विक्रम काळे (Vikram Kale) म्हणाले, आपल्या जिल्ह्याला 23 टीएमसी पाणी आणण्यासाठी आपण सर्वांनी मिळून अजित दादांना खंबीर साथ देणे गरजेचं आहे. आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित दादांनी आपल्या सर्व शेतकऱ्यांना एक रुपयांमध्ये पिक विमा देण्याचा निर्णय सरकारमध्ये असताना घेतलेला आहे. आज अनेकांना त्याचा फायदा होत आहे. यापुढे देखील अर्चना ताईंना लीड मिळवून देण्यासाठी मोठ्या संख्येने मंतदान करा असे आवाहन देखील त्यांनी केले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Shivajirao Adhalrao Patil Vs Amol Kolhe : आढळराव पाटील आणि अमोल कोल्हे यांचा उद्या भोसरी विधानसभेत प्रचार दौरा

Baramati Loksabha | सुप्रिया सुळे आणि वहिनी सुनेत्रा पवार यांच्यात कोणाकडे आहे जास्त संपत्ती?

Madhav Bhandari | ‘देव-धर्माचा विषय शरद पवारांच्या “सात बाऱ्या’ वर कधीच दिसला नाही, त्यामुळे…’, माधव भंडारी यांचा टोला