Madhav Bhandari | ‘देव-धर्माचा विषय शरद पवारांच्या “सात बाऱ्या’ वर कधीच दिसला नाही, त्यामुळे…’, माधव भंडारी यांचा टोला

Madhav Bhandari | अयोध्या येथील मंदिरात बाल रामचंद्राची मूर्ती आहे. याची माहिती न घेताच प्रभू श्री रामचंद्राच्या मंदिरात सीतामाईंची मूर्ती का नाही याची चौकशी नास्तिक म्हणवणार्‍या पवारांनी करू नये. त्यांनी आपल्या शेताच्या बांधातच बोलावे, देव, धर्म, देऊळ या त्यांच्या प्रांतात नसलेल्या बांधात घुसखोरी करू नये, असा टोला भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी (Madhav Bhandari) यांनी शुक्रवारी लगावला.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी अयोध्येतील मंदिरात सीतेची मूर्ती का नाही?, असा सवाल अलिकडेच उपस्थित केला आहे. त्यासंर्दभात भांडारी बोलत होते. भांडारी म्हणाले की, पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्याने असे विधान करण्यापूर्वी प्राथमिक माहिती घेतली असती तरी बरे झाले असते. कुटुंबातील सुनेला बाहेरची म्हणून आपला स्त्री शक्तीबद्दलचा खरा दृष्टिकोन दाखवणार्‍या साहेबांनी ऊसाचा उतारा, द्राक्षाची छाटणी, डाळींब लागवड यासारख्या त्यांच्या अभ्यासाच्या विषयांवर हवे तितके बोलावे. मात्र देव-धर्म, संस्कृती विषय त्यांच्या “सात बाऱ्या’ वर कधीच दिसला नाही. अभ्यास नसलेल्या अशा विषयांबद्दल बोलून पवार साहेबांसारख्या ज्येष्ठ नेत्याने आपल्या ‘मती’चे दिव्यदर्शन घडवू नये.

पवारांच्या कृषी क्षेत्रातील ज्ञानाबद्दल सर्वांनाच आदर आहे. त्यांनी आपल्या संबंधित क्षेत्राबाबत मत प्रदर्शन केले तर कोणाचाच आक्षेप असण्याचे कारण नाही. मात्र ते स्वत:ला नास्तिक म्हणवतात. त्यामुळे प्रभू रामचंद्राच्या मंदिरात सीतामाईची मूर्ती का नाही, याची काळजी त्यांनी करू नये, असेही ते म्हणाले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Supriya Sule | माझी लढाई अदृश्य शक्तीच्या विरोधात

Devendra Fadnavis | ही निवडणूक देशाचा नेता निवडण्याची आहे, विचार करुन मत द्या

Sharad Pawar | गेल्या दहा वर्षांत सर्वसामान्य जनतेला केवळ फसवण्याचं काम झाले