Ajit Pawar | कोरोनाच्या संकटातच कोल्हे राजीनामा घेऊन आले होते, अजित पवारांचा गौप्यस्फोट

Ajit Pawar | पाच वर्षांपूर्वी आता विरोधात उभे राहिलेल्यांसाठी आपण झटलो. त्यांना निवडून आणले. पण कोरोनाचे संकट आले आणि अशा संकटातच “ते” राजीनामा घेऊन माझ्याकडे आले होते. असा गौप्यस्फोट शनिवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिरूर लोकसभेचे खासदार डॉ.अमोल कोल्हे यांच्या बाबत मोशी येथे केला.

महायुतीचे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ मोशी येथील गणेश बँक्वेट हॉलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने भोसरी विधानसभेतील केंद्रप्रमुख व बूथ कमिटीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती, या बैठकीत अजित पवार यांनी मार्गदर्शन केले.

अजित पवार पुढे म्हणाले लोकसभा निवडणुक ही देशाची निवडणूक आहे. ती गावकी भावकीची निवडणूक नाही. मागील पंचवार्षिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिलेल्या उमेदवारांसाठी आपण अशाच प्रकारचे मेळावे घेतले होते. सभा घेतल्या. त्यांना निवडून आणण्यासाठी आपण झटलो.त्यांना निवडून देखील आणले. मात्र निवडून आल्यानंतर दीड दोन वर्षातच कोरोनाचे संकट आले. ज्यांना आपण निवडून आणले ते माझ्याकडे राजीनामा घेऊन आले होते. त्यांना मी विचारले की तुम्हाला कशासाठी राजीनामा द्यायचा आहे. असे करू नका, असा खुलासा अजित पवारांनी (Ajit Pawar) केला.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Devendra Fadnavis | महायुतीला मोदींचे इंजिन असून हे इंजिन देशातील नव्हे तर जगातील पॉवरफुल इंजिन

Ajit Pawar | बारामतीत काही लोकांनी मी केलेल्या कामांची पुस्तिका छापली, अजित पवारांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल

Dharashiv LokSabha | नरेंद्र मोदी यांच्या सभेची धाराशिवरांना उत्सुकता, ‘या’ दिवशी करणार दौरा