Sunil Tatkare | या निवडणुकीने उद्याच्या महाराष्ट्राचे भवितव्य ठरवले जाणार आहे

Sunil Tatkare | परराष्ट्र धोरण, परराष्ट्र नीती व्यवस्थितपणे नरेंद्र मोदी (Narendra Modi) हाताळत आहेत. खंडप्राय देशात ठळकपणे सर्वसामान्य योजना नियोजन पध्दतीने राबवल्या जात आहेत. अटलसेतूमुळे कोकणच्या विकासाचे स्वप्न पूर्ण झाले आहे. कोस्टल हायवेचे काम पूर्णत्वाकडे जात आहे. ७०० कोटी रुपये नितीन गडकरी यांनी हायवेसाठी दिले आहेत. २०२४ पर्यंत ४जी आणि ५जी नेटवर्क पूर्ण केले जाईल असे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार सुनिल तटकरे (Sunil Tatkare) यांनी पेण येथील जाहीर सभेत दिले.

पेणच्या ऐतिहासिक नगरीतील गणरायाच्या आशिर्वादाने नरेंद्र मोदी यांना तिसर्‍यांदा पंतप्रधान करतानाच ४०० पार आकडा गाठला जाईल असा विश्वास खासदार सुनिल तटकरे यांनी व्यक्त केला.अनंत गीते भाजपचे कव्हर होते म्हणून तुम्ही निवडणूक लढलात. सलग दोनवेळा मंत्री असूनही एका फुटक्या कवडीचे काम मतदारसंघात करता आले नाही असा जोरदार टोलाही सुनिल तटकरे यांनी लगावला.

मुंबई मनपा जशी उबाठाचा आत्मा आहे तशी रायगडची जिल्हा परिषद शेकापचा आत्मा आहे. त्यामुळे रायगड आणि मुंबईतील आगामी निवडणुकीत महायुतीचे एकत्रित झेंडा फडकवुया असे आवाहनही सुनिल तटकरे यांनी केले.आलेला हा जनसमुदाय या मतदारसंघाची दिशा ठरवणार आहे. उद्याच्या महाराष्ट्राचे भवितव्य ठरवले जाणार आहे. त्यामुळे राज्यात ४५+ जागा येतील त्यात रायगडचा मोठा सहभाग असेल असा दावा सुनिल तटकरे यांनी केला.

या निवडणूकीने वेगळा बेंचमार्क ठरणार आहे. आपली लढाई ही बुथवर लढायची आहे. ७० टक्के मतदान सुनिल तटकरे यांना कसे होईल आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सुनिल तटकरे यांचा ऐतिहासिक विजय विक्रमी मताधिक्याने करायचा आहे असे आवाहन सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी केले.

काल काही जाहिरनामे प्रसिद्ध झाले आहेत. कितीही जाहिरनामे प्रसिद्ध झाले तरी ४ जूननंतर नरेंद्र मोदीच पंतप्रधान होणार आहेत ही काळया दगडावरची रेघ आहे असा विश्वास रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला. ही निवडणूक लोकसभेची आहे परंतु काहीजण ग्रामपंचायत निवडणुकीसारखे लढत आहेत. विरोधकांनी रचलेला डाव ओळखण्याची आज गरज आहे असे सांगतानाच शरद पवारांच्या नेतृत्वाखाली उबाठा चालत आहे असा थेट हल्लाबोलही उदय सामंत यांनी केला.

सुनिल तटकरे यांना रायगड लोकसभा मतदारसंघातून सर्वाधिक मताधिक्य देणारच शिवाय रत्नागिरी जिल्ह्यातूनही मताधिक्य देण्याचे आश्वासन उदय सामंत यांनी यावेळी दिले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Murlidhar Mohol | जेवढी मतदानाची टक्केवारी वाढेल, तेवढ्या महायुतीच्या जागा जास्त निवडून येतील – चंद्रकांत पाटील

Shirur LokSabha | “मी डमी नाही तर डॅडी उमेदवार आहे”, आढळराव पाटलांचे अमोल कोल्हेंचे प्रत्युत्तर

Sunetra Pawar | केंद्र व राज्य सरकारचा दुवा बनून समस्यांचं निराकरण करणार; सुनेत्रा पवार यांचे प्रतिपादन