Mumbai Indians | डगआउटमधून खाणाखुणा करणं आलं अंगलट, मुंबईच्या पोलार्ड अन् टिम डेव्हिडला बीसीसीआयने सुनावली शिक्षा

बीसीसीआयने मुंबई इंडियन्सचे (Mumbai Indians) फलंदाजी प्रशिक्षक किरॉन पोलार्ड (Kieron Pollard) यांना मोठा दंड ठोठावला आहे. पोलार्डसोबतच टीम डेव्हिडही (Team David) चौकशीच्या कक्षेत आला असून त्यालाही बीसीसीआयने शिक्षा केली आहे. पंजाब किंग्सविरुद्धच्या रोमहर्षक सामन्यात मुंबईने 9 धावांनी विजय मिळवला. मात्र पंचांच्या निर्णयावरून या सामन्यात बराच वाद झाला होता.

पोलार्ड-डेव्हिडवर दंड ठोठावला
वास्तविक, बीसीसीआयने किरॉन पोलार्ड आणि टीम डेव्हिडवर मॅच फीच्या 20 टक्के दंड ठोठावला आहे. पोलार्ड आणि डेव्हिड आयपीएलच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी आढळले आहेत. बोर्डाच्या म्हणण्यानुसार, मुंबईचे फलंदाजी प्रशिक्षक किरॉन पोलार्ड आणि टीम डेव्हिड यांनी आयपीएल आचारसंहितेच्या कलम 2.20 च्या लेव्हल 1 चे उल्लंघन केले आहे, त्यामुळे या दोघांना ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. पोलार्ड आणि डेव्हिडने आपली चूक मान्य करत ही शिक्षा स्वीकारली आहे. मात्र, पोलार्ड-डेव्हिडला कोणत्या कारणासाठी दंड ठोठावण्यात आला आहे, याचा उल्लेख करण्यात आलेला नाही.

वाइडवरून वाद झाला
पंजाब किंग्ज आणि मुंबई (Mumbai Indians) यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात वाइडच्या निर्णयावरून बराच वाद झाला होता. वास्तविक, मुंबईच्या डावात सूर्यकुमार यादव क्रीजवर होता आणि अर्शदीप सिंगच्या हातात चेंडू होता. अर्शदीपने ऑफ स्टंपच्या बाहेर एक चेंडू टाकला, जो अंपायरने वाईड घोषित केला नाही.

यानंतर मुंबई डगआउटमधून किरॉन पोलार्ड आणि टीम डेव्हिडने सूर्याला डीआरएस घेण्याचे संकेत दिले. सूर्यकुमारने लगेच पंचांकडून रिव्ह्यू मागितला. पंजाबचा कर्णधार सॅम कुरन यानेही या प्रकारावर नाराजी व्यक्त केली, मात्र पंचांनी त्याचे ऐकले नाही. त्यानंतर तिसऱ्या पंचाने चेंडू वाईड घोषित केला.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Shivajirao Adhalrao Patil Vs Amol Kolhe : आढळराव पाटील आणि अमोल कोल्हे यांचा उद्या भोसरी विधानसभेत प्रचार दौरा

Baramati Loksabha | सुप्रिया सुळे आणि वहिनी सुनेत्रा पवार यांच्यात कोणाकडे आहे जास्त संपत्ती?

Madhav Bhandari | ‘देव-धर्माचा विषय शरद पवारांच्या “सात बाऱ्या’ वर कधीच दिसला नाही, त्यामुळे…’, माधव भंडारी यांचा टोला