Tanaji Sawant | मोदींना पुन्हा पंतप्रधान बनवण्यासाठी हा कडवट शिवसैनिक अर्चना पाटलांच्या मागे पूर्ण ताकदीने उभा

Tanaji Sawant | धाराशिव हा शिवसेनेचा पारंपारीक मतदार संघ. पण केवळ महायुतीचा धर्म पाळण्यासाठी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनवण्यासाठी हा कडवट शिवसैनिक अर्चना पाटील (Archana Patil) यांच्या मागे पूर्ण ताकदिने उभा आहे. त्यांना जास्तीत जास्त मताधिक्य मिळवून देण्यासाठी हा तानाजी सावंत छातीचा कोट करून उभा आहे, अशा भावना राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी आज व्यक्त केल्या.

धाराशिव लोकसभा मंतसंघातून आज माहायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांचा उमेदवारी अर्ज आज भरण्यात आला. यावेळी आयोजीत प्रचार रॅलीमध्ये तानाजी सावंत बोलत होते. यावेळी राणाजगजीतसिंग पाटील, अर्चना पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार विक्रम काळे आदी उपस्थित होते.

सावंत म्हणाले, धाराशिव लोकसभा मतदारसंघांचा प्रचार हा जानेवारीमध्येच मी सुरू केला आहे. हा मतदारसंघ कडवट शिवसैनिकाचा मतदारसंघ आहे. तरीसुद्धा महायुतीचा धर्म पाळण्यासाठी आम्ही हा मतदारसंघ राष्ट्रवादीसाठी सोडला. मात्र,  ज्या वेळेस पुढच्या व्यासपीठावर येऊ त्यावेळेस समोरच्याचा फडश्या पाडल्याशिवाय मी स्वस्थ  बसणार नाही. अशाच पद्धतीने जर माझ्या शिवसेनेचा एक एक मतदारसंघ कमी होवू लागला तर हा शिवसैनिक कधीही सहन करणार नाही. मात्र, यावेळेस ‘अबकी  बार चारसो पार’करून विश्वनेता नरेंद्र मोदी यांना आपल्याला पुन्हा पंतप्रधान करायचे आहे. त्यामुळे आपलं दुःख विसरून माझ्या तमाम शिवसैनिकांना माझा मानाचा मुजरा आणि कळकळीची विनंती आहे की, प्रचारात सगळ्यांच्या पुढे घड्याळांचे पदाधिकारी असतील त्याच्याही पुढे शिवसैनिकांनी उभे राहून अर्चना ताईंना लीड मिळवून द्यायचा आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Shivajirao Adhalrao Patil Vs Amol Kolhe : आढळराव पाटील आणि अमोल कोल्हे यांचा उद्या भोसरी विधानसभेत प्रचार दौरा

Baramati Loksabha | सुप्रिया सुळे आणि वहिनी सुनेत्रा पवार यांच्यात कोणाकडे आहे जास्त संपत्ती?

Madhav Bhandari | ‘देव-धर्माचा विषय शरद पवारांच्या “सात बाऱ्या’ वर कधीच दिसला नाही, त्यामुळे…’, माधव भंडारी यांचा टोला