दारू नको दूध प्या, सुखी जीवनाचा आनंद घ्या – खासदार बापट

पुणे :  वर्षाच्या शेवटच्या दिवशी दारू पिऊन आयुष्याची नासाडी करण्यापेक्षा दारू न पिता दूध पिउन सुखी जीवनाचा आनंद घेता येईल असे मत खासदार गिरीश बापट यांनी व्यक्त केले भारतीय जनता पार्टी च्या वतीने ३१डिसेंबर च्या पार्श्वभूमीवर व्यसन मुक्तीचे प्रबोधन करण्यासाठी अप्पा बळवंत चौक येथे अभियान राबविण्यात आले त्यावेळी खासदार बापट बोलत होते.

बापट पुढे म्हणाले, ‘व्यसनामुळे वैयक्तीक आरोग्याची मोठी हानी होते त्याचा त्रास संपूर्ण कुटुंबाला होतो.आर्थिक सामाजिक हानी होते विशेषतः युवकांमध्ये व्यसनाधीनतेचे प्रमाण जास्त आहे युवकांनी दारू आणि तत्सम व्यसनापासून दूर रहावे या साठी दारू नको दूध प्या हा जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात आला.

या वेळी स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने ,पुणे शहर सरचिटणीस राजेश येनपुरे,नगरसेवक ,अजय खेडेकर,नगरसेविका आरती कोंढरे कसबा मतदारसंघाचे अध्यक्ष प्रमोद कोंढरे,सरचिटणीस छगन बुलाखे ,राजेंद्र काकडे अश्विनी पांडे यांच्या सह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते