Eknath Shinde | रणरणत्या उन्हात मुख्यमंत्र्यांचा बाईक रॅलीतून प्रचार, राजू पारवे यांच्या प्रचाराला प्रचंड प्रतिसाद

रामटेकचे महायुतीचे उमेदवार राजू पारवे (Raju Parve) यांच्या प्रचारात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बाईक रॅलीमध्ये सहभाग घेतला. या प्रचार फेरीत मुख्यमंत्र्यांनी स्वत: मोटारसायकल चालवत राजू पारवेंच्या विजयासाठी मतदारांना साद घातली. या बाईक रॅलीमुळे उमरेडमध्ये महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण झाले. य़ाच मतदार संघात मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी दोन प्रचार सभा घेतल्या होत्या.

विदर्भातील कडक उन्हाची पर्वा न करता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) रामटेकचे उमेदवार राजू पारवेंसाठी आज रोड शो केला. या बाईक रॅलीला महायुतीच्या कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी दिसून आली. रामटेकला शिवसेनेचा उमेदवार निवडून येईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांना राम नवमीच्या शुभेच्छा दिल्या.

देशाला विकासाकडे नेण्यासाठी तुमचे एक-एक मत महत्त्वाचे आहे. महायुतीचे उमेदवार राजू पारवे यांना मत म्हणजे देशाच्या विकासाला मत आणि धनुष्यबाणाला मत म्हणजे नरेंद्र मोदी यांना मत, हे आपल्याला ठरवायचे आहे. येत्या १९ एप्रिल रोजी धनुष्यबाणाचे बटन दाबून राजू पारवे यांना विजयी करा, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी मतदारांना केले. रामटेक प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. जो रामाचा नाही तो कामाचा नाही असे सांगत दिल्लीत नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी राजू पारवे यांना विजयी करायचे आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

प्रभू रामाची निशाणी धनुष्यबाण आणि महायुतीची निशाणी धनुष्यबाण आहे. मतदानाच्या दिवशी धनुष्यबाणावर बटन दाबून राजू पारवेला संसदेत पाठवयाचे आहे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी प्रचार रथातून केले.

मोदीजींसाठी नेशन फर्स्ट हा अजेंडा आहे. विरोधकांकेड झेंडा आणि अजेंडा नाही तर ते कमिशन आणि करप्शन फर्स्टसाठी काम करतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १० वर्षात केलेले काम आणि काँग्रेसने ५० ते ६० वर्षांत केलेले काम जनतेसमोर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्म राजनितीसाठी नाही तर राष्ट्रनितीसाठी झालाय. त्यांनी संपूर्ण जीवन देशासाठी समर्पित केलंय, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Ajit Pawar | भावनिक न होता देशाच्या भवितव्यासाठी महायुतीला मतदान करा; माजी सैनिकांच्या मेळाव्यात अजित पवारांचे आवाहन

Shivajirao Adhalrao Patil | “जनतेच्या प्रेमाची कळवळ म्हणून मी राजकारणात”, आढळराव पाटलांनी व्यक्त केल्या भावना

Ravindra Dhangekar | पुण्याच्या विकासापेक्षा धंगेकरांसाठी टिका टिपण्णी महत्त्वाची; व्हिजनच्या नावानेही बोंबाबोंब