Ravindra Dhangekar : काँग्रेसच्या महत्वाच्या बैठकीला जाणं रविंद्र धंगेकरांनी टाळलं? समोर आलं मोठं कारण 

 Ravindra Dhangekar : गेल्या काही दिवसांपासून पुणे कॉंग्रेसमध्ये मोठी धुसफूस सुरु असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे. यातच पुण्यात आज काँग्रेस पक्षाची पश्चिम महाराष्ट्र विभागीय महत्वाची बैठक होती. मात्र, या महत्वाच्या बैठकीला कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी दांडी मारल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.

आज काँग्रेस पश्चिम महाराष्ट्र विभागीय बैठकीसाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार संग्राम थोपटे, आमदार प्रणिती शिंदे, आमदार विश्वजीत कदम, जेष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Former Chief Minister Prithviraj Chavan, MLA Sangram Thopte, MLA Praniti Shinde, MLA Vishwajit Kadam, Senior Leader Sushil Kumar Shinde, State President Nana Patole) उपस्थित होते.त्यामुळे आजच्या महत्वाच्या बैठकीला विशेष महत्व होते मात्र धंगेकर गैरहजर राहिल्याने उलटसुलट चर्चा सुरु झाल्या.

दरम्यान, पुण्यातील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर गेल्या दोन दिवसांपासून उपचार सुरू आहेत. त्यामुळे ते आजच्या बैठकीला येऊ शकलेले नाहीत, असं धंगेकरांनी माध्यमांना कळवले आहे. दरम्यान, या  बैठकीत आमदार रवींद्र धंगेकर यांनी दांडी मारल्यामुळे आणि पोस्टरवर त्यांचा फोटो नसल्यामुळे पत्रकारांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना सवाल केला. याबाबत नाना पटोले म्हणाले की, आमदार रवींद्र धंगेकर यांची तब्येत ठीक नसल्याने ते या बैठकीत उपस्थित राहू शकले नाही असं सांगत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.

महत्वाच्या बातम्या-