विकास कामात राजकारण नको.. गट-तट विसरून शासकीय योजनांचा लाभ घ्या – नवोदिता घाटगे  

कागल / प्रतिनिधी – केंद्र व राज्य सरकारच्या लोककल्याणकारी योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्यास शिंदे-फडणवीस सरकार (Shinde Fadnavis Government) प्रयत्नशील आहे. या योजनांपासून कोणीही अलिप्त राहू नये यासाठी विकास कामात राजकारण न आणता व गट-तट याचा विचार न करता तळागाळातील नागरिकांनी शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी पुढे यावे असे आवाहन राजमाता जिजाऊ महिला संघटनेच्या कार्याध्यक्षा नवोदिता घाटगे यांनी केले.

येथील श्रमिक वसाहतीत बांधकाम कामगारांना साहित्य वाटप,आयुष्यमान भारत कार्ड, आबा कार्ड चे वितरण प्रसंगी राजे विक्रमसिंह घाटगे फाउंडेशन व भाजपा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी उपनगराध्यक्षा नम्रता कुलकर्णी  होत्या. पर्यावरणाचा संदेश म्हणून उपस्थित असलेल्या सर्वच मान्यवरांच्या हस्ते रोपट्याला पाणी घालून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी प्रदीप जाधव यांची पुणे येथे पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल नवोदिता घाटगे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

घाटगे पुढे म्हणाल्या,राजे फाउंडेशन आणि राजमाता जिजाऊ महिला संघटनेच्या माध्यमातून शासकीय योजना उपेक्षित घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी भाजपाच्या नेतृत्वाखाली जिल्हाध्यक्ष राजे समरजीतसिंह घाटगे प्रयत्नशील आहेत. तालुक्यातील एकही नागरिक शासकीय योजनांपासून वंचित राहणार नाही याची आपण खबरदारी घेऊया. ज्यांना या योजनांचा अद्यापही लाभ मिळालेला नाही त्यांनी अगदी बिनदिक्कतपणे माझ्याशी संपर्क साधावा,तत्काळ अशा लाभार्थ्यांना त्यांचा लाभ मिळवून दिला जाईल असेही त्यांनी सांगितले.

यावेळी राजमाता जिजाऊ महिला संघटनेच्या कार्याध्यक्षा नवोदिता घाटगे यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात योगेश चंद्रकांत कुराडे,प्रवीण दिलीप हणबर या बांधकाम कामगारांना पेट्यांचे वाटप करण्यात आले तर आयुष्यमान भारत कार्डचे मंगल सुरेश कुराडे व प्रवीण दिलीप हणबर यांना तर आबा कार्ड चे अनिल शिवा संकपाळ,तानाजी बापू मगदूम यांना वितरित करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी के.एस. पाटील, विवेक कुलकर्णी, पांडुरंग जाधव, वसंतराव घोडके, साधना पाटील, रेखा मोगले, मधुकर संकपाळ, आकाश पाटील, आनंदराव भोपळे, प्रताप घाटगे, सचिन मोकासे, प्रदीप कोराने, अभिजीत माने, तानाजी मगदूम ,, रोहित मोगले यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी,कार्यकर्ते तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी अर्चना साळुंखे यांनी मनोगत व्यक्त केले.  स्वागत प्रास्ताविक पांडुरंग जाधव यांनी केले तर आभार रोहीत मोरबाळे यांनी मानले..

कागलकरांची पाणीटंचाई सुटणार…….
गेल्या अनेक वर्षांपासून ऐन उन्हाळ्यात योग्य त्या पाण्याच्या नियोजनाअभावी कागलकरांना  पाणी समस्येला सामोरे जावे लागत आहे.ही बाब लक्षात घेऊन राजे समरजीतसिंह घाटगे यांनी येथील जयसिंगराव तलावातील साचलेला गाळ काढण्याचे  काम चालू झाले आहे. त्यामुळे येत्या काळात तलावात मुबलक पाणीसाठा होणार असून कागलकरांना भेडसावणारा पाणीटंचाईचा प्रश्न  सुटणार असल्याचे महिला कार्यकर्त्या किरण प्रदीप कोराने यांनी सांगताच उपस्थित असलेल्या सर्वांनीच राजेंच्या या उपक्रमाचे  टाळ्या वाजवून स्वागत केले.