अखेर भाजपला 2024 मध्ये विजयाचा फॉर्म्युला मिळाला, जाणून घ्या काय आहे मास्टर प्लान 

BJP Plan For 2024: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी एक वर्षापेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे. पीएम मोदींच्या (PM Narendra Modi) नेतृत्वाखाली भाजपने तयारी सुरू केली आहे, मात्र कर्नाटकातील धक्क्यानंतर भाजप सावध असून कोणतीही चूक करू इच्छित नाही. त्यामुळेच भाजप २०२४ मध्ये मोठे बदल करून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहे. या बदलातून भाजपला विजयाचा फॉर्म्युला मिळाला आहे का, भाजपची योजना समजून घेऊया.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 2024 मध्ये केंद्र सरकारमध्ये सहभागी असलेल्या सर्व मंत्र्यांना लोकसभा निवडणूक लढवण्याचे भाजपने ठरवले आहे. मोदी सरकारचे अनेक बडे आणि कुशाग्र मंत्री निवडणुकीच्या मैदानात दिसू शकतात. म्हणजेच परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांसारखे नेते  जे आता राज्यसभेचे सदस्य आहेत ते स्वतःसाठी मते मागताना दिसू शकतात.

पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वाने या मंत्र्यांना 2024 मध्ये स्वत:साठी लोकसभेच्या जागा शोधण्यास सुरुवात करण्याचा संदेश दिला आहे, जिथून ते निवडणूक लढवू शकतात. एवढेच नाही तर या मंत्र्यांच्या जागांचीही चर्चा सुरू झाली आहे. परराष्ट्रमंत्री एस जयशंकर हे दिल्लीतील कोणत्याही जागेवरून किंवा तामिळनाडूतून निवडणूक लढवू शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

धर्मेंद्र प्रधान यांनी ओडिशातील देवघरमधून एकदाच निवडणूक जिंकली आहे. अशा परिस्थितीत ते ओडिशातीलच कोणत्याही जागेवरून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनीही तयारी सुरू केली आहे. 2019 मध्ये, सिंधिया यांनी गुना मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली पण भाजपकडून पराभव पत्करावा लागला. नंतर सिंधिया यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि ते राज्यसभेचे खासदार झाले. आता पुन्हा एकदा ते लोकसभेच्या तयारीला लागले आहेत.

यादीत या मंत्र्यांची नावे

1.   निर्मला सीतारामन – तामिळनाडू

2. परराष्ट्र मंत्री डॉ सुब्रह्मण्यम जयशंकर – तामिळनाडू

3. पीयूष गोयल -महाराष्ट्र

4. धर्मेंद्र प्रधान -ओरिसा

5. नारायण राणे किंवा त्यांचे सुपुत्र निलेश राणे –  महाराष्ट्र

6. सर्बानंद सोनोवाल –  आसाम

7. ज्योतिरादित्य सिंधिया –  मध्य प्रदेश

8. अश्विनी वैष्णव – ओडिशा

9. हरदीप सिंग पुरी – पंजाब किंवा जम्मू-काश्मीर

10. मनसुख मांडविया –  – गुजरात

11. भूपेंद्र यादव –  -हरियाणा किंवा राजस्थान

12. पुरुषोत्तम रुपाला  – गुजरात