‘ईडीवर बोलू नको रे, ईडीवाले बीडी प्यायला लावतील’

मुंबई : किरीट सोमय्या आणि संजय राऊत यांच्या वादात आता नारायण राणे यांनी देखील उडी घेतली आहे. चुकीच्या कामामुळे घाबरून त्यांना आता घाम फुटला होता, खंर तर हे सांगण्यासाठी त्यांनी शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेतली. असं म्हणत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आता संजय राऊत यांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे संजय राऊत नारायण राणे यांना काय प्रत्युत्तर देतात, हे पहाणं आता महत्वाचे ठरेल.

या पत्रकार परिषदेत नारायण राणे यांनी संजय राऊत यांची जोरदार खिल्ली उडवली आहे. संजय राऊत यांनी काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत ईडी अधिकाऱ्यांवरही गंभीर आरोप केले आहेत. हाच धागा पकडत ‘ईडीवर बोलू नको रे, ईडीवाले बीडी प्यायला लावतील’, असा जोरदार टोला राणेंनी लगावला आहे.

संजय राऊतांचा डोळा उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर आहे. यांनी राष्ट्रवादीकडून सुपारी घेतली आहे. संजय राऊत पूर्ण राष्ट्रवीदचे आहेत. असा आरोप राणेंनी केला आहे. संजय राऊत लोकप्रभात असताना उद्धव आणि बाळासाहेब या दोघांवरही टीका करण्याचं सोडलं नव्हतं, आता म्हणतो, माननीय बाळासाहेबांच्या आशीर्वादाने, उद्धव ठाकरेंच्या आशीर्वीदाने…तू पत्रकार नाहीच, संपादक नाही. तुझी भाषा त्या गुणवत्तेची नाहीच. बेकार आरोप करतो. हा काल अस्वस्थ का झाला, हा काल असा बेजाबदार का बोलत होता, प्रवीण राऊतने ईडीला दिलेल्या मुलाखतीनंतर याचा थयथयाट झाला. असा घणाघातही राणेंनी केला आहे.