Hanuman Jayanti 2023: कलियुगात ‘या’ ठिकाणी भगवान हनुमान आहेत विराजमान 

भगवान हनुमानाची जयंती (Hanuman Jayanti) गुरुवार, 06 एप्रिल 2023 रोजी साजरी केली जाईल. शास्त्रानुसार हनुमानजींना भगवान रामाकडून अमर होण्याचे वरदान मिळाले होते आणि हनुमान कलियुगातही उपस्थित आहेत असे मानले जाते.शास्त्रामध्ये  भगवान हनुमानाचे कलियुगाचे देवता म्हणून वर्णन केले आहे. असे म्हणतात की जो भक्त हनुमानजींची खऱ्या भक्तीने पूजा करतो, त्याला देव नक्कीच दर्शन देतो. म्हणूनच त्याला कलियुगातील जिवंत किंवा जागृत देवता म्हटले गेले आहे.तुलसीदासजींनी कलियुगात हनुमानाच्या उपस्थितीचाही उल्लेख केला आहे. हनुमानजींच्या कृपेनेच तुलसीदासजींना राम आणि लक्ष्मणजींचे दर्शन मिळाले. असे म्हणतात की आजही कलियुगात भगवान हनुमान काही ठिकाणी विराजमान आहेत. भगवान हनुमान केवळ त्यांच्या भक्तांमध्येच नाही तर रामभक्तांच्या मनातही वास करतात.  रामायणात असा उल्लेख आहे की भगवान राम जेव्हा पृथ्वीलोक सोडत होते तेव्हा भक्त हनुमानालाही त्यांच्यासोबत जायचे होते. पण रामजी म्हणाले, जेव्हा कलियुगाचा काळ येईल आणि धर्माचा अंत होईल, तेव्हा तुम्ही रामभक्तांच्या हृदयात राहाल. म्हणूनच राम भक्तांच्या हृदयात हनुमानजी नेहमीच वास करतात.

गंधमादन पर्वत : कलियुगात या पर्वतावर भगवान हनुमानाचे वास्तव्य होते, याचे अनेक पुरावे अनेक ठिकाणी आढळतात. या ठिकाणी तपश्चर्या करून अनेक ऋषी-मुनींनी हनुमानजींचे दर्शन घेतल्याचे सांगितले जाते. महर्षी कश्यप यांनीही याच पर्वतावर तपश्चर्या केली होती. हा पर्वत कैलास पर्वताच्या उत्तरेस आहे. भगवान रामाकडून अमरत्वाचे वरदान मिळाल्यानंतर हनुमानजींनी याच पर्वताला आपले निवासस्थान म्हणून निवडले.

किष्किंधा अंजनी पर्वत : रामायणात या पर्वताचा उल्लेख आहे. माता अंजनीने कर्नाटकातील कोप्पल आणि बेल्लारी जिल्ह्यांजवळील किष्किंधा भागात या पर्वतावर तपश्चर्या केली. प्रभू राम आणि हनुमानजींची भेटही याच पर्वतावर झाली होती. कलियुगातही हनुमानजींचा या पर्वतावर वास असल्याचे सांगितले जाते.याशिवाय अयोध्येत देखील मारुतीराया वास करतो असं सांगण्यात येते.

रामायण पाठ: धर्मग्रंथात असे म्हटले आहे की जिथे जिथे रामायणाचे पठण केले जाते, तिथे भगवान हनुमान नक्कीच कोणत्या ना कोणत्या रूपात उपस्थित असतील. त्यामुळे अनेकवेळा असे दिसून येते की जिथे जिथे रामायणाचे पठण केले जाते तिथे माकडे येतात.