सोनिया गांधी आणि राहुल गांधींना ईडीची नोटीस; खासदार संजय राऊत भडकले 

नवी दिल्ली : मनी लाँड्रिंग (Money laundering) प्रकरणी नॅशनल हेराल्ड (National Herald) प्रकरणात काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress leader Rahul Gandhi) आज अंमलबजावणी संचालनालयासमोर हजर झाले आहेत. राहुल गांधी आज ईडीपुढं (ED)  जबाब नोंदवणार आहेत. मात्र दुसरीकडे आता काँग्रेसने सत्ताधारी भाजपवर (BJP) सूडाच्या राजकारणात गुंतल्याचा आरोप केला आहे आणि आम्ही माघार घेणार नसल्याचे  म्हटले आहे.

दरम्यान,  काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Soniya Gandhi) आणि खासदार राहुल गांधी यांना पाठवण्यात आलेली नोटीस (Notice) बेकायदेशीर असल्याचे शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हटले. आज काँग्रेसकडून होणारे आंदोलन हा केंद्रीय यंत्रणांचा भाजपकडून होत असलेल्या दुरुपयोगाविरोधातील संताप असल्याचेही संजय राऊत यांनी सांगितले.

भाजपच्या विरोधकांना केंद्रीय तपास यंत्रणांकडून त्रास देण्याचे षडयंत्र आहे. त्याचाच एक भाग म्हणून सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना नोटीस देण्यात आली असल्याचे राऊत यांनी म्हटले. केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून विरोधकांचा सुरू असलेला हा छळ हा देशाच्या स्वातंत्र्याला आणि लोकशाहीला खड्ड्यात घालण्याचे काम करत असल्याचेही राऊत यांनी सांगितले.

दरम्यान,  ईडीच्या या कारवाई विरोधात काँग्रेसचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. राहुल गांधी यांना ईडीनं पाठवलेल्या समन्स विरोधात काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते दिल्लीत मोर्चा काढणार होते. मात्र, दिल्ली पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली आहे. त्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी राहुल गांधींच्या घरासमोर एक पोस्टर (Poster) लावले आहे. हे पोस्टर सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. या पोस्टरवर ‘सत्य झुकेगा नही’! असं लिहलं आहे.