फडणवीस कुटुंबीय तुळजा भवानीच्या दर्शनाला; मनोभावे दर्शन घेत केली पूजा 

तुळजापूर – महाराष्ट्र राज्याचे उपमुखमंञी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या मातोश्री व बंधु अशिष फडणवीस यांनी गुरुवार दि १७ रोजी तिर्थक्षेञ तुळजापूरला येवून श्रीतुळजाभवानी मातेचा कुलधर्म कुलाचार करुन मनोभावे दर्शन घेतले.या पुजेचे पौराहित्य पुजारी सचिन अमृतराव यांनी केले.

श्रीतुळजाभवानी माता ही फडणवीस घराण्याची कुलदेवता असल्याने प्रत्येक वर्षी फडणवीस कुंटुंबायातील मंडळी तिर्थक्षेञ तुळजापूरला देवीचा कुलधर्म न चुकता करतात. शुक्रवार दि १७ रोजी उपमुखमंञी देवेंद्र फडणवीस यांच्या मातोश्री व बंधु तसेच सुन हे तिर्थक्षेञ तुळजापूरला आले व देविजींची मनोभावे पुजा केली.  देविजींना फडणवीस कुटुंबियांकडून दागिना अर्पण केला. नंतर देविदारी जागरण गोंधळ कट्यावर गोंधळाचा विधी करुन मनोभावे दर्शन करुन तिर्थक्षेञ अक्कलकोट कडे प्रयान केले.

देविजींच्या पुजेनंतर उपमुखमंञी देवेंद्र फडणवीस यांच्या मातोश्री तसेच अशिष फडणवीस यांचा मंदीर संस्थान तर्फ विश्वस्त तथा आ. राणा जगजितसिंह पाटील यांनी देविची प्रतिमा व महावस्ञ देवुन सत्कार केला. यावेळी  जि. प. उपाध्यक्ष अर्चना पाटील, प्रशासकीय अधिकारी तथा तहसिलदार योगिता कोल्हे, नितीन काळे, विशाल रोचकरी, विक्रमसिंह देशमुख, संतोष बोंबडे सह भाजपा पदाधिकरी उपस्थितीत होते