Prakash Shendge | भुजबळांनी माघार घेतली, तू ही घे नाहीतर…अशी धमकी देत ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंच्या गाडीवर शाईफेक

Prakash Shendge | लोकसभा निवडणुकीपूर्वी मराठा आणि ओबीसी समाजातील वाद चव्हाट्यावर आला होता. लोकसभा निवडणुकीतही त्याचे पडसाद उमटाताना पाहायला मिळत आहेत. नाशिक लोकसभा मतदारसंघातून ओबीसी नेते छगन भुजबळ  यांनी उमेदवारीवरुन माघार घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता ओबीसी बहुजन पार्टीचे उमेदवार प्रकाश अण्णा शेंडगे ( Prakash Shendge) यांनाही माघार घेण्यास सांगत धमकी देण्यात आली आहे.

सांगली लोकसभा मतदार संघात ओबीसी बहुजन पार्टीकडून प्रकाश अण्णा शेंडगे उमेदवार आहेत. त्यांच्या गाडीला अज्ञातांकडून चप्पलांचा हार घालण्यात आल्याचा प्रकार रविवारी उघड झाला. तसेच त्या गाडीवर शाही फेकण्यात आली आहे. गाडीच्या बोनेटवर काळी शाई फेकत पुढे चप्पलचा हार घातला. त्यावेळी एक पत्रक लावण्यात आले. त्यात धमकी दिली आहे. लोकसभा निवडणुकीत छगन भुजबळ यांनी माघार घेतली तू ही माघार घे, मराठ्यांच्या नांदी लागू नको, अन्यथा…अशी धमकी दिली आहे. हॉटेल ग्रेट मराठासमोर त्यांची गाडी उभी असताना शनिवारी रात्री अज्ञातांकडून हा प्रकार करण्यात आला आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Devendra Fadnavis | महायुतीला मोदींचे इंजिन असून हे इंजिन देशातील नव्हे तर जगातील पॉवरफुल इंजिन

Ajit Pawar | बारामतीत काही लोकांनी मी केलेल्या कामांची पुस्तिका छापली, अजित पवारांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल

Dharashiv LokSabha | नरेंद्र मोदी यांच्या सभेची धाराशिवरांना उत्सुकता, ‘या’ दिवशी करणार दौरा