सेमीफायनलच्या उंबरठ्यावर असताना भारताला मोठा धक्का! आघाडीचा अष्टपैलू दुखापतीमुळे सामन्याबाहेर

Hardik Pandya Injury: भारत आणि बांगलादेश (india vs bangaladesh) यांच्यात विश्वचषक सामना खेळला जात आहे. पुण्यात दोन्ही संघ आमनेसामने आहेत. नाणेफेक जिंकून बांगलादेश संघ प्रथम फलंदाजी करत आहे. त्याचवेळी भारतीय संघाला मोठा (team India) झटका बसला आहे. टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या (Hardik Pandya) गोलंदाजी करताना जखमी झाला. त्यानंतर त्याला मैदान सोडावे लागले.

बांगलादेशच्या डावातील नववे षटक टाकण्यासाठी हार्दिक पांड्या आला. मात्र या षटकात त्याला केवळ 3 चेंडू टाकता आले. यानंतर भारतीय अष्टपैलू खेळाडूला मैदान सोडावे लागले. विराट कोहलीने (virat kohli) हार्दिक पांड्याचे ओव्हर पूर्ण केले.

भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याला दुखापतीनंतर रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. हार्दिक पांड्याचे रुग्णालयात स्कॅनिंग करण्यात येणार आहे. त्यामुळे हार्दिक पांड्या आज पुन्हा मैदानात दिसणार नाही. भारतासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. पण हार्दिक पांड्या पुढच्या सामन्यापर्यंत तंदुरुस्त होईल का हा सर्वात मोठा प्रश्न आहे.

https://youtu.be/tr2tvuJfQq4?si=M8a1sEkkAwwC09hl

महत्वाच्या बातम्या-

सत्य विरुद्ध सत्ता च्या लढाईसाठी राष्ट्रवादी सज्ज; शरद पवारांनी घेतला सात लोकसभा मतदार संघाचा आढावा

ललितने सात किलो चांदी न नेता फक्त पंचवीस लाख रुपयांची रोख रक्कम नेत केले पलायन ?

शरद पवार सुप्रिया सुळे यांना हमासच्या बाजूने लढण्यासाठी गाझाला पाठवतील – सरमा