Pak Vs Afg : अफगाणिस्तानी चाहत्यांनी पाकिस्तानी चाहत्यांना केली बेदम मारहाण 

दुबई – आशिया चषक 2022 (Asia Cup 2022) मध्ये गुरुवार हा अत्यंत लाजिरवाणा दिवस होता . मैदानापासून सुरू झालेली ही लढत स्टेडियमबाहेर पोहोचली. अफगाणिस्तानचे चाहते स्टेडियममध्येच पाकिस्तानी चाहत्यांवर तुटून पडले आणि पाकिस्तानी चाहत्यांना बेदम मारहाण केली. ही लढत स्टेडियमबाहेर सुरू होण्यापूर्वी स्टेडियमच्या आतही जोरदार मारहाण झाली होती. अफगाण चाहत्यांनी स्टेडियमचेही नुकसान केले आणि या सगळ्याचे कारण आहे पाकिस्तानी खेळाडू आसिफ अलीचे लज्जास्पद कृत्य.

आसिफचे लज्जास्पद कृत्य

वास्तविक आसिफ फलंदाजी करत होता आणि फरीदच्या चेंडूवर अफगाणिस्तानचा खेळाडू आऊट होताच आसिफला इतका राग आला की तो मैदानावरच फरीदला मारायला गेला. बॅटने फटके मारण्याचा प्रयत्न केला. शारजाहमध्ये सुरू असलेल्या आशिया चषकात पाकिस्तानने भलेही सामना जिंकला असेल, पण पाकिस्तानी खेळाडूने केलेल्या लाजिरवाण्या कृत्याने समोरच्या संघाचे डोके खाली आणले. आसिफच्या या कृत्यानंतर आयसीसी त्याच्यावर बंदीही घालू शकते.

दरम्यान, आशिया चषकाच्या सुपर फोरमध्ये पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात बुधवारी अतिशय रोमांचक सामना पाहायला मिळाला. या सामन्यात अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 6 गड्यांच्या मोबदल्यात 129 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल शेवटच्या षटकात नसीम शाहने मारलेल्या सलग दोन षटकारांच्या जोरावर संघाने अखेरच्या षटकात मोठ्या कष्टाने विजयाचे लक्ष्य गाठले. हा सामना पाकिस्तानने जिंकला असेल, पण त्यांच्या खेळाडूने केलेल्या लाजिरवाण्या कृत्याने संघाची मान शरमेने खाली झुकली आहे.