अखेर ‘पॉर्न व्हिडीओ’ प्रकरणी महाराजांसह व्हिडीओतील महिलेवर गुन्हा दाखल

ठाणे – राज्यभरात एक प्रतिष्ठीत किर्तनकार म्हणून ओळख असलेल्या एका महाराजांचा ‘नको तसला’ व्हिडीओ व्हायरल (Aurangabad Viral Video) झाला आहे. या व्हायरल व्हिडिओने मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, हे महाराज आणि व्हिडिओमध्ये दिसणारी महिला दोघेही गेल्या अनेक दिवसांपासून कीर्तन करतात.

व्हिडिओतील किर्तनकार महाराज (Kirtankar Maharaj) हे जिल्ह्यातील नामवंत किर्तनकार आहेत. त्यांचा मोठा भक्त परिवार आहे. दोघांचे युट्यूबवर (Youtube) मोठे फॉलोअर्सवर सुद्धा आहेत. मात्र, त्यांचे नको त्या अवस्थेतील दोन व्हिडिओ व्हायरल (viral video)  झाल्याने त्यांचा भक्तांना मोठा धक्का बसला आहे .

दरम्यान, या मुद्द्यावरून सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई चांगल्याच आक्रमक झाल्या असून या महाराजांवर कारवाई करावी अशी त्यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे मागणी केली आहे. समव्यावसायिक क्षेत्रातील महिलेसोबतची अश्लील चित्रफीत व्हायरल झाल्याने अखेर वैजापूरच्या त्या महाराजासह महिलेवर धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी शिलेगाव पोलीस ठाण्यात रविवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. बाळकृष्ण मोगल (वय ४८, रा. लासूरगाव, ता. वैजापूर) असे आरोपीचे नाव आहे.

एका हॉटेलमध्ये विवाहबाह्य संबंधातून (Extramarital affair) हा प्रकार घडला असल्याचे पुढे येत आहे. या प्रकारामुळे धार्मिक भावना दुखावल्या असून, ज्ञानेश्वर माणिकराव खिल्लारे यांच्या फिर्यादीवरून बाळकृष्ण मोगल याच्यासह त्या समव्यावसायिक महिलेवर शिलेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक रवींद्र खांडेकर करत आहेत.लोकमतने याबाबत वृत्त दिले आहे.