Govt Scheme :  राजर्षी शाहू महाराज शिष्यवृती योजना; विद्यार्थ्यांस मिळतील १५ हजार ४०० यु.एस. डॉलर

Pune  – परदेशातील नामांकित विद्यापिठामध्ये प्रवेश मिळालेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांना पदव्युत्तर व पी.एच.डी. अभ्यासक्रमाकरिता ही शिष्यवृती देण्यात येते.

योजनेच्या अटी व शर्ती

■महाराष्ट्राचा रहिवासी असावा

■पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी ३५ वर्षे पीएचडीसाठी ४० वर्षे ही कमाल वयोमर्यादा असेल.

■विद्यार्थ्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ६ लाखापेक्षा जास्त नसावे.

■जागतिक क्रमवारीमध्ये पहिल्या १०० विद्यापीठामध्ये लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना उत्पन्न मर्यादा लागू नाही.

■परदेश शिष्यवृती योजनेअंतर्गत दोन वर्षे कालावधीचाच एमबीए अभ्यासक्रम अनुज्ञेय राहील.

■भारतीय आयुर्विज्ञान परीषदेच्या संकेतस्थळावरील एमडी व एमएस अभ्यासक्रमच प्रवेशासाठी पात्र असणार आहे.

■परदेशातील शिक्षण संस्था ही जागतिक क्रमवारीत ३०० च्या आत असावी.

योजनेअंतर्गत लाभ

■विद्यार्थ्यांस वार्षिक निर्वाह भत्ता अमेरिका व इतर राष्ट्रांसाठी यु.एस. डॉलर १५ हजार ४०० तर यु.के. साठी जी.बी.पौंड ९ हजार ९०० इतका अदा करण्यात येतो.

■विद्यार्थ्याला आकस्मिक खर्चासाठी यु.एस. ए. व इतर देशांसाठी यू.एस. डॉलर १ हजार ५०० तर यु.के साठी जी.बी. पौंड १ हजार १०० इतके देण्यात येतात.

अधिक माहितीसाठी संपर्क: आयुक्त, समाज कल्याण, महाराष्ट्र राज्य, पुणे