धक्कादायक :  गणपती मंदिरावरील सोन्याचा कळस गेला चोरीला

सोलापूर – सोलापुरातील मश्रूम गणपती मंदिराचा 24 तोळे वजनाचा सोन्याचा कळस चोरीला गेला आहे. (Ganapati temple 24 tola gold culmination stolen) सोलापूर-तुळजापूर महामार्गावरील हिप्परगा गावातील गणपतीचा कळस चोरीला गेल्याने खळबळ उडाली आहे. ( 24 tola gold culmination has been stolen of Mushroom Ganapati temple in Solapur)

सोलापूर-तुळजापूर महामार्गावरील हिप्परगा गावात मश्रूम गणपतीचे मंदिर आहे. सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यांनी या गणपतीची स्थापना केल्याचा इतिहास आहे. यापूर्वीही 2016 मध्येदेखील या मंदिराचा कळस चोरीला गेला होता. सोन्याचा कळस दुसऱ्यांदा चोरीला गेल्याने नागरिक संतप्त झालेत.

सिद्धरामेश्वरांनी स्थापन केलेल्या अष्टविनायक गणपतींपैकी सातवा गणपती म्हणून ओळखला जातो. तळे हिप्परगा येथील मशरुम गणेशाच्या सुवर्ण कळसाने बुधवारी पहाटे खळबळ उडवून दिली. सहा वर्षांनंतर चोरट्याने दुसऱ्यांदा हा प्रकार केला आहे.