Muralidhar Mohol | पुणेकर विकासाला प्राधान्य देतात त्यामुळे आमचा विजय निश्चित

Muralidhar Mohol | गेल्या दहा वर्षांत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी पुण्यासाठी जे योगदान दिले. मेट्रो, चांदणी चौक प्रकल्प, वैद्यकीय महाविद्यालय, एक हजार कोटी रुपयांचा नदी सुधार प्रकल्प, सार्वजनिक वाहतूक सक्षमीकरणासाठी इलेक्ट्रिक बसेसची उपलब्धता आदी योजना आणि प्रकल्प पुण्याला मिळाले. पुणेकर विकासाला प्राधान्य देतात. त्यामुळे आमचा विजय निश्चित असल्याचे मत पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी-आरपीआय आणि घटक पक्षांच्या महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांनी व्यक्त केले.

भाजप शिवसेना राष्ट्रवादी आरपीआय महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी ग्रामदैवत कसबा गणपतीचे दर्शन घेतले. त्यानंतर शहरातील थोरांच्या स्मारकांना भेटी देऊन अभिवादन केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मोतीबाग कार्यालय आणि माजी खासदार स्वर्गीय गिरीश बापट आणि आमदार मुक्ता टिळक यांच्या निवासस्थानी भेट देऊन आदरांजली अर्पण केली.

या प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष धीरज घाटे, राष्ट्रवादी काँग्रेस चे शहराध्यक्ष दीपक मानकर,प्रदीप देशमुख  शिवसेनेचे शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे, अजय भोसले, आर पी आय चे शहराध्यक्ष संजय सोनवणे , परशुराम वाडेकर, ऍड मंदार जोशी , शिवसंग्रामचे भरत लगड,लहुजी क्रांती सेनेचे विष्णू कसबे, लोकजनशक्ती पार्टीचे शहराध्यक्ष संजय आल्हाट, प्रदेश भ ज पा उपाध्यक्ष राजेश पांडे ,लोकसभा प्रभारी श्रीनाथ भिमाले , महायुती चे समन्वयक संदीप खर्डेकर कसबा निवडणूक प्रमुख हेमंत रासने, गानेध बिडकर यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

मोहोळ पुढे म्हणाले, राज्यात 2014 ते 2019 च्या देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात पुण्यासाठी अनेक योजना आल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचे सरकार पुण्याचा सर्वांगीण व समतोल विकास करण्यासाठी कटिबद्ध आहे. महापालिकेत पाच वर्षे भाजपची सत्ता म्हणून विकासाची कामे केली आहेत. भविष्यातील पन्नास शंभर वर्षांचे नियोजनएक व्हिजन डोळ्यासमोर ठेवून काम करणे आणि आमच्या सगळ्यांचा प्रयत्न आहे. त्या दृष्टीने आम्ही पुणेकरांकडे कौल मागणार आहोत. संपूर्ण देशवासियांनी निश्चय केला आहे नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करायचे ठरवले आहे, त्यासाठी पुणेकरांचे एक मत मोदींना पंतप्रधान करण्यासाठी द्यायचे आहे.

महत्वाच्या बातम्या :

पुण्यात मुरलीधर अण्णांचाच विजय पक्का? ‘हे’ फॅक्टर्स मिळवून देणार त्यांना महाविजय?

Sharad Pawar | मोदी साहेब माझ्या बोटाला हात लावू नका, शरद पवारांचा पंतप्रधानांना इशारा

Amol Kolhe | जे सरकार शिवाजी महाराजांच्या पहिल्या राजधानीच्या नावाने नामकरण करतं, ते सरकार त्यांचे आदर्श पाळते का?