भारतीय संघाच्या नावावर लज्जास्पद विक्रम, श्रीलंकेविरोधात जिंकूनही टीम इंडियाचा झाला अपमान!

Ind vs SL : आशिया चषक 2023 च्या (Asia Cup 2023) सुपर-2 च्या महत्त्वाच्या सामन्यात भारतीय संघाने श्रीलंकेचा पराभव करून सामना जिंकलाच, पण दोन लाजिरवाण्या विक्रमांचीही नोंद केली. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने 49.1 षटकांत सर्व गडी गमावून 213 धावा केल्या, तर श्रीलंकेचा संघ केवळ 172 धावा करू शकला. अशाप्रकारे प्रथम पाकिस्तान आणि नंतर श्रीलंकेचा पराभव करून भारत फायनलमध्ये पोहचला आहे.

ज्या मैदानावर भारतीय संघाने पाकिस्तानविरुद्ध खूप धावा केल्या होत्या, त्याच मैदानावर ही कामगिरी थोडं आश्चर्यचकित करणारी होती. त्याहून आश्चर्याची गोष्ट म्हणजे टीम इंडियाच्या सर्व 10 विकेट्स फिरकीपटूंनी घेतल्या. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात संपूर्ण संघ फिरकी गोलंदाजीचा बळी ठरण्याची ही पहिलीच वेळ होती. कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमवर  दिनुथ वेलालगेने खळबळ उडवून दिली.

श्रीलंकेने भारताचा डाव 49.1 षटकांत अवघ्या 213 धावांत गुंडाळला. यात वेललागेने  शुबमन गिल (19), विराट कोहली (3), रोहित शर्मा (53) आणि केएल राहुल (39) यांना एकापाठोपाठ एक बाद करून भारतीय फलंदाजीची पाळेमुळे हादरवली. वेलालगेने 10 षटकांत 40 धावांत 5 बळी घेतले, ज्यात एका मेडनचा समावेश होता.

आश्चर्यकारक बाब म्हणजे पार्ट टाईम फिरकीपटू चारिथ असलंका यानेही 4 विकेट घेतल्या. महेश तिक्ष्णाला एक विकेट मिळाली. सर्व विकेट फिरकीपटूंना गेल्या. एकदिवसीय सामन्यात फिरकीपटूंसमोर भारतीय क्रिकेट संघ कोसळण्याचीही ही पहिलीच वेळ आहे.

https://youtube.com/shorts/Ju1y8hb1NHI?si=0qtW1pIMZiZwogoI

महत्वाच्या बातम्या-
कृषी सेवक पदभरती साठी ३ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
मराठवाडा विभागात कृषी प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी आराखडा तयार करा; धनंजय मुंडेंचे निर्देश
फडणवीस ,बावनकुळे यांचा अवमान केला तर त्याच भाषेत उत्तर देऊ, चित्रा वाघ यांचा इशारा