Vishal Patil | गंगाधर ही शक्तिमान ? काँग्रेसच्या स्नेहभोजनात बंडखोर विशाल पाटलांची उपस्थिती

Sangli Vishal Patil | सांगली लोकसभा निवडणुकीत बंडखोरी केल्याने विशाल पाटील हे चांगलेच चर्चेत होते. आता हेच विशाल पाटील पुन्हा चर्चेत आले आहेत.  सांगलीत काँग्रेसच्या स्नेहभोजन कार्यक्रमात बंडखोर उमेदवार विशाल पाटलांनी उपस्थिती लावल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय.

विशाल पाटलांच्या (Vishal Patil) उपस्थितीमुळे सांगलीत नक्की काँग्रेसचा पाठिंबा कुणाला होता…? असा प्रश्न उपस्थित केला जातोय…काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी निवडणुकीत प्रचारासाठी राबलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी स्नेहभोजन आयोजित केलं होतं…विशेष म्हणजे स्नेहभोजनाच्या कार्यक्रम पत्रिकेत प्रमुख उपस्थिती म्हणून विशाल पाटील आणि विश्वजीत कदम यांच्या नावांचा उल्लेख होता.

वास्तविक मविआतील सांगली लोकसभेचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या पाठीशी काँग्रेस असल्याचा निवडणुकीदरम्यान काँग्रेसकडून वारंवार सांगण्यात आलं होतं…मात्र, स्नेह भोजनाला विशाल पाटलांची प्रमुख उपस्थिती असल्याने चर्चांना उधाण आलंय. गंगाधर ही शक्तिमान असल्याची कुजबुज सुरु झाली आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप