श्रावण महिन्यात रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी समोर आली आनंदाची बातमी; पाहा काय आहे खास

Pune: श्रावण महिना (Shravan Month) सुरू आहे, आणि तुम्ही ट्रेनने प्रवास (Train Travel) करत आहात, तर तुम्हाला प्रवासादरम्यान शुद्ध शाकाहारी जेवण मिळू शकते. या महिन्यात बहुतेक लोक कांदा खात नाहीत. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला शाकाहारी जेवण आवडत असेल तर तुम्ही ते ऑर्डर करू शकता. ट्रेनमध्ये प्रवास करताना तुम्हाला आता पूर्णपणे सात्विक भोजन मिळू शकणार आहे.

भारतीय रेल्वेने इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) च्या मदतीने इस्कॉनच्या गोविंदा रेस्टॉरंटशी करार केला आहे. आता तुम्ही गोविंदा रेस्टॉरंटमधून जेवण ऑर्डर करून ट्रेनमध्ये एन्जॉय करू शकता. IRCTC ही सुविधा सुरुवातीला दिल्लीतील हजरत निजामुद्दीन स्थानकावरून शाकाहारी प्रवाशांना देत आहे. रेल्वेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सावन महिन्यात या सुविधेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे . तसेच अन्य स्थानकावर शाकाहारी भोजनाची व्यवस्था सुरू करण्याचा रेल्वे विचार करत आहे. रेल्वेच्या विविध झोनमध्ये ही सुविधा सुरू झाल्याने सात्विक आहार घेणाऱ्यांना याचा फायदा होणार आहे.

रेल्वे बोर्डाचे (Railway Board)म्हणणे आहे की, पॅन्ट्रीतील खाद्यपदार्थाच्या शुद्धतेबाबत प्रवासी अनेकदा शंका घेतात. त्यामुळे लांबचा प्रवास करणाऱ्यांना त्रास होतो. जे प्रवासी कांदा-लसूणही खात नाहीत, त्यांना अनेकदा सात्विक भोजन मिळत नाही. आता अशा प्रवाशांना कोणतीही अडचण येणार नाही. प्रवाशांना ट्रेनमध्ये सात्त्विक पदार्थ खायला आवडतात, तुम्ही गोविंदा रेस्टॉरंटमधून जेवण मागवून खाऊ शकता. दुसऱ्या स्थानकावर ही सुविधा लवकरच सुरू होईल, अशी अपेक्षा आहे.

जर तुम्हाला या सेवेचा लाभ घेऊन सात्विक जेवण मागायचे असेल , तर तुम्ही IRCTC ई-कॅटरिंग वेबसाइट किंवा फूड ऑन ट्रॅक अॅपवर बुक करू शकाल. ट्रेन सुटण्याच्या किमान 2 तास आधी प्रवाशांना PNR क्रमांकासह ऑर्डर द्यावी लागेल. यानंतर सात्विक भोजन तुमच्या आसनावर पोहोचेल.

खाद्यपदार्थात काय मिळेल?

धार्मिक प्रवासाला जाणाऱ्या लोकांना लक्षात घेऊन ही सेवा सुरू करण्यात आल्याचे आयआरसीटीसीकडून सांगण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात चांगला प्रतिसाद मिळाल्यास त्याचा विस्तार केला जाईल. मेनूमध्ये डिलक्स थाळी, महाराजा थाळी, जुनी दिल्ली व्हेज बिर्याणी, पनीर डिशेस, नूडल्स, दाल मखनी यासह अनेक सात्विक पदार्थांचा समावेश आहे.