Govt Scheme : ठक्करबाप्पा आदिवासी वस्ती सुधारणा विस्तारीत कार्यक्रम योजना

योजनेचा उद्देश

राज्यातील आदिवासी क्षेत्राच्या सर्वागीण विकासासाठी ही योजना आहे. या योजने अंतर्गत राज्यातील सर्व जिल्ह्यातील ग्रामीण तसेच नागरी भागातील आदिवासी उपाययोजना क्षेत्र अतिरिक्त आदिवासी उपाययोजना क्षेत्र, माडा, मिनीमाडा, प्रस्तावीत माडा मिनीमाडा क्षेत्र आदिवासी उपाययोजना क्षेत्राबाहेरील ५० टक्क्यापेक्षा जास्त आदिवासी लोकसंख्या असलेल्या वस्त्या, वाड्या, पाडे व गाव यामध्ये सामुहिक विकासाच्या सुविधा निर्माण करण्यात येत आहेत.

योजने अंतर्गत सामुहिक विकासाच्या सुविधा

  • मुख्य वस्ती पर्यंत जोड रस्ते, सिमेंट कॉक्रिट तसेच डांबरीकरणाचे अंतर्गत रस्ते, शाळेचे कंपाऊंड करणे
  • पिण्याच्या शुध्द पाण्याची सोय करणे, फिल्टर प्लॅन्ट उभारणे, पाणी पुरवठा योजना करणे, बोअर करणे, हातपंप बसविणे, सबमर्सिबल पंप बसविणे, सार्वजनिक हौद बांधणे
  • जुन्या विहीरीची दुरुस्ती, विहीरीचे खोलीकरण, गाळ काढणे, बोअरची दुरुस्ती, विंधन विहीरी पाईप वाढविणे.
  • बंद गटार बांधणे, नाल्या तसेच मोऱ्या बांधणे.
  • आदिवासी वस्तींचे विद्युतीकरण, मार्ग दिप बसविणे, पारंपारिक उर्जाद्वारे मार्गदिप बसविणे.
  • समाजमंदिर बांधणे. मंगल कार्यालय, वाचनालय तसेच व्यायाम शाळा स्थापन करणे.
  • सार्वजनिक शोचकुप व मुतारीचे बांधकाम करणे.
  • स्मशान भुमि बांधकाम.
  • नदी काटची संरक्षण भिंत, घाट बांधणे.
  • तीर्थक्षेत्र व पर्यटन विकास.
  • ग्रामपंचाय कार्यालय, ग्राम सचिवालय बांधकाम.

संपर्क : प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प घोडेगाव ता.आंबेगाव जि.पुणे