Govt scheme : राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत कोरडवाहू क्षेत्र विकास योजना काय आहे? 

राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत कोरडवाहू क्षेत्र विकास योजना 

योजनेच्या अटी

◆अल्प व अत्यल्प भूधारक व महिला शेतकऱ्यांना प्राधान्य असेल. योजनेअंतर्गत ५० टक्के निधी यासाठी खर्च केला जाईल.

◆प्रस्तावित निधीच्या १६  व ८ टक्के किंवा अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती यांच्या लोकसंख्येच्या टक्केवारीच्या प्रमाणात अनुक्रमे अनुसूचित जाती व जमाती या प्रवर्गासाठी खर्च करण्याची तरतूद असेल.

◆लाभार्थी हा सध्याच्या प्रचलित पीक पद्धतीमध्ये बदल करून एकात्मिक शेती पद्धतीतील बाबी राबविण्यास इच्छुक असावा.

◆प्रत्येक उपविभागातून दोन प्रकल्प निवडण्यात येतील. संपूर्ण एका गावाचे क्षेत्र प्रकल्प क्षेत्र म्हणून निवडण्यात येते.

◆या योजनेअंतर्गत यापूर्वी प्रकल्प राबविलेला नसावा.

योजनेअंतर्गत लाभ

●फळपीक आधारीत शेती पद्धती – २५ हजार रुपये प्रति हेक्टर.

●दुग्धोत्पादक पशुधन आधारीत शेती पद्धती-

४० हजार रुपये  प्रति हेक्टर.

●इतर पशुधन आधारीत शेती पद्धती- २५ हजार रुपये प्रति हेक्टर.

●ग्रीन हाउस ट्यु ब्युलर टाइप नैसर्गिक वायुवीजन-

४६८ प्रति चौ.मी.