Sunil Tatkare | शिव- शाहू-फुले-आंबेडकर यांच्या सामाजिक समतेला अधिक प्रगल्भ करण्यासाठी आपल्या आशिर्वादाची गरज

Sunil Tatkare | म्हसळा (मेदंडी )  | महाराष्ट्राच्या व्यापक हिताला शिव – शाहू – फुले – आंबेडकर यांच्या सामाजिक समतेला अधिक प्रगल्भ करण्यासाठी आपल्या आशिर्वादाची गरज आहे अशी हाक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार सुनिल तटकरे (Sunil Tatkare) यांनी दिली. म्हसळा तालुक्यातील पाभरे, मेंदडी, वरवटणे या पंचायत समिती गणात महायुतीच्या जाहीर सभा आज पार पडल्या.

सर्वसामान्य माणसावर रात्री – बेरात्री प्रसंग आला तर त्यांना मदतीची आवश्यकता असते. त्यासाठी २४ तास उपलब्ध असले पाहिजे या भूमिकेतून आम्ही काम करत आलो आहे. देशाला प्रगतीपथावर नेण्याचे काम एनडीए व मोदीसाहेबांच्या माध्यमातून करत आहेत तर राज्याला प्रगतीपथावर नेण्याचे काम एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार करत आहेत. इथे आपल्यासोबत आम्ही या परिसराचा विकास करण्यासाठी कालबद्ध पध्दतीने काम करत आहोत असेही सुनिल तटकरे म्हणाले.

सर्वधर्मसमभाव पध्दतीने लोकांचे काम करत असताना त्यांच्या अंत:करणाच्या भावनांना राज्यसरकारच्या माध्यमातून योग्यपध्दतीने मदत करताना सर्वकष जीवन समृद्ध करण्याचे काम करत आहोत असेही सुनिल तटकरे यांनी सांगितले.

माझी लोकं संकटात असताना त्यांच्यापर्यंत पोचलो पाहिजे. जनतेवर कोणतेही संकट आल्यावर त्यांच्या मदतीला धावून गेले पाहिजे हे माझे कर्तव्य समजतो. सुनिल तटकरे हा दिलेल्या शब्दाचा पक्का आहे. तुम्ही मागता ते मी देत आलो आहे. या मतदारसंघात पायाभूत सुविधा निर्माण झाल्याच आहेत शिवाय इतर कामे करण्याची बांधिलकी घेतली आहे. सुखदुःखाच्यावेळी तुमच्यासोबत राहिलो आहे. कुठला मोहल्ला असेल किंवा वाडी, वस्ती असेल विकास कामांपासून शिल्लक राहिलेली नाही. प्रत्येक घराघरात नळाद्वारे पाणी दिल्याशिवाय गप्प बसणार नाही असा शब्द सुनिल तटकरे यांनी यावेळी दिला.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Pune Loksabha | मोहोळ प्रचंड मताने निवडून येतील, देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

Shivajirao Adhalarao Patil | राऊतांसारखी कोल्हेंनी सकाळी उठून काहीही बडबड करू नये, आढळरावांनी का साधला निशाणा?

Amol Kolhe | केंद्रातील सरकार बदलणार ही काळ्या दगडावरची रेष, अमोल कोल्हेंचा सूतोवाच