Harbhajan Singh | एकता रोहित टी२० वर्ल्ड कप जिंकून देऊ शकत नाही, माजी भारतीय क्रिकेटरचे विधान

Harbhajan Singh | इंडियन प्रीमियर लीग २०२४ चा थरार संपल्यानंतर लगेचच टी२० विश्वचषक २०२४ (T20 World Cup 2024) ची सुरुवात होणार आहे. विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली असून रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्याकडे नेतृत्वपद सोपवण्यात आले. दरम्यान माझी भारतीय गोलंदाज हरभजन सिंह याने रोहित शर्मावर मोठे भाष्य केले आहे.

हरभजन सिंगनं (Harbhajan Singh) एकटा रोहित शर्मा विजय मिळवून देऊ शकत नाही, असं म्हटलंय. हरभजन सिंगनं अलकीडेच एका मुलाखतीत यावर भाष्य केलंय. भारताचा सध्याच्या कॅप्टन रोहित शर्मा यानं धोनीच्या पावलावर पाऊल टाकत सांघिक कामगिरीली प्राधान्य देणं महत्त्वाचं असल्याचं म्हटलं.

रोहित शर्मा एकटा आपल्याला वर्ल्ड कप जिंकून देऊ शकत नाही. मी नाही आपण सर्व अशी भावना ठेवणं भारतीय टीमसाठी आवश्यक असल्याचं हभजन सिंग म्हणाला. आपण किंवा आम्ही या भावनेनं खेळल्यास आपण मोठी गोष्ट मिळवू शकतो, असं हरभजन सिंग म्हणाला.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप