काळी पडलेली तांब्याची भांडी ‘या’ उपायांनी करा स्वच्छ, दिसू लागतील एकदम नवी

How to Clean Copper: स्टील, सिरॅमिक, अॅल्युमिनियम आणि लोखंडी भांडी बहुतेक घरांमध्ये खाण्यासाठी आणि स्वयंपाक करण्यासाठी वापरली जातात. पण काही गोष्टींसाठी घरात तांब्या-पितळेची भांडीही वापरली जातात. अधूनमधून वापर केल्यामुळे या भांड्यांवर पडलेली घाण साचून ती काळी पडू लागतात, ज्यामुळे ही भांडी खराब आणि जुने दिसू लागतात. त्यामुळे जर तुमच्या घरातही तांब्याच्या भांड्यांची चमक नाहीशी झाली असेल तर तुम्ही या मार्गांनी त्याची चमक परत आणू शकता.

लिंबाचा रस
तांब्याची भांडी मीठ आणि लिंबाच्या पाण्याने धुवा, यासाठी अर्ध्या लिंबावर मीठ लावून तांब्याच्या भांड्यावर घासून घ्या किंवा मीठ आणि लिंबाचा रस मिसळून पेस्ट बनवा आणि तांब्याच्या भांड्यावर पेस्टप्रमाणे लावा. नंतर गरम पाण्याने हे भांडे स्वच्छ करा.

मीठ आणि बेकिंग सोडा
तांब्याची भांडी स्वच्छ करण्यासाठी मीठ आणि बेकिंग सोडा देखील प्रभावी ठरतात. मीठ आणि खाण्याचा सोडा मिक्स करून तांब्याची भांडी स्वच्छ केली तर भांडी चमकू लागतात. तुम्ही फक्त बेकिंग सोड्याने तांब्याची भांडी देखील स्वच्छ करू शकता.

चिंचेचा वापर
तांब्याची भांडी स्वच्छ करण्यासाठी पिकलेली चिंच सर्वात फायदेशीर आहे. यासाठी चिंच एक कप पाण्यात अर्धा तास भिजत ठेवा. थोडं वितळलं की फक्त पाण्यात मॅश करा. आता हे चिंचेचे पाणी भांड्याच्या स्क्रबरने भांड्याभोवती लावा आणि दोन मिनिटे राहू द्या. आता ते स्क्रबरने चांगले घासून घ्या. जिथे भांडी जास्त घाण दिसत असेल तिथे चिंचेचे पाणी स्क्रबरने लावून पुन्हा चोळा. अतिशय घाणेरड्या भांड्यांवर ओल्या चिंचेचा कोळ लावा आणि नंतर स्वच्छ करा. चिंचेच्या पाण्याने तांब्याची भांडी चमकतील.