यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्रिपदाबाबत केलेल्या वक्तव्यामुळे उद्धव ठाकरे दुखावले ?

अमरावती – आज शरद पवारच ( Sharad Pawar ) मुख्यमंत्री हवे होते. ती काळाची गरज आहे. शरद पवार यांनी आत्तापर्यंत चारवेळा मुख्यमंत्रीपद भुषवलं आहे. मात्र महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतर जर शरद पवार मुख्यमंत्री असते तर चित्र काहीसं वेगळं असतं असं वक्तव्य यशोमती ठाकूर ( Yashomati Thakur ) यांनी केलं आहे.

अमरावतीच्या डॉक्टर पंजाबराव देशमुख विद्यापीठातील शिवाजी महाराज पुतळ्याचे अनावरण आणि सभागृहाचे उद्घाटन प्रसंगी यशोमती ठाकूर यांनी शरद पवार यांचं कौतुक केलं. त्याचवेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. महाविकास आघाडी बनवण्या त्यांचा प्रमुख आत असला तरी आजच्या तारखेत ते मुख्यमंत्री असायला होते. ती आज काळाची गरज आहे असं त्या म्हणाल्या.

दरम्यान, मंत्री यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्रिपदाबाबत केलेल्या वक्तव्यामुळे उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) काहीसे दुखावले गेल्याची माहिती समोर आली आहे. ठाकूर यांच्या या वक्तव्याची गेल्या दोन दिवसांपासून राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. ठाकूर यांच्या या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीत चुकीचा संदेश जाऊ शकतो. त्यामुळे उद्धव ठाकरे हे नाराज झाले आहेत. हे वक्तव्य म्हणजे एकप्रकारे आपल्यावरील सूचक भाष्य असून त्यामुळे महाविकास आघाडीतील मंत्री आणि मुख्यमंत्र्यांमध्ये अंतर आहे, असे वाटू शकते, अशी भावना उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केल्याचे समजते.