चुकीच्या बँक अकाउंटवर ट्रान्सफर झालेत पैसे? त्वरित ‘या’ ३ गोष्टी करा आणि परत मिळवा पैसे
ऑनलाइन पेमेंटच्या या युगात कोणाला बँक खात्यात पैसे पाठवायचे असतील, तर प्रत्येकजण घरी बसून ऑनलाइन पेमेंट (Online Payment) करण्यासाठी नेटबँकिंगचा (Net Banking) वापर करतो. पण कधीतरी तुमच्यासोबत असे घडले असेल की, तुम्ही चुकीच्या खात्यात पैसे पाठवले असतील. चुकीच्या बँक खात्यात पैसे ट्रान्सफर झाल्यानंतर आता पैसे परत (Money Transfer In Wrong Bank Account) कसे येणार?, हा प्रश्न पडतो आणि तणाव वाढू लागतो. आज या लेखात आम्ही तुम्हाला अशाच तीन कामाच्या टिप्स सांगणार आहोत, ज्या तुम्ही चुकीच्या खात्यात पैसे पाठवण्यात आल्यानंतर लगेच कराव्यात.
आरबीआयने नेहमीच सांगितले आहे की, जेव्हाही तुम्ही एखाद्याच्या बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करता तेव्हा पैसे पाठवण्यापूर्वी प्राप्तकर्त्याचे तपशील जसे की बँक खाते क्रमांक, IFSC कोड इत्यादी काळजीपूर्वक वाचा.
चुकीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर झाल्यास या 3 गोष्टी करा
१) तुम्हाला सर्वात पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या बँकेच्या शाखेला भेट द्यावी लागेल आणि मॅनेजरला या घटनेची माहिती द्यावी लागेल. जसे की तुम्ही चुकून कोणत्या खात्यात पैसे ट्रान्सफर केले आहेत. असे करण्यामागचे कारण म्हणजे या प्रकरणी लवकरात लवकर कारवाई करता येईल.
2) तुमचे खाते आणि प्राप्तकर्त्याचे खाते एकाच बँकेत असल्यास, अशा परिस्थितीत बँक कॉल किंवा ईमेलद्वारे प्राप्तकर्त्याशी संपर्क साधते. जर मंजुरी मिळाली तर पैसे परत आणण्यासाठी प्रयत्न करता येतील. जर प्राप्तकर्ता ज्याच्या बँक खात्यात चुकून पैसे गेले आहेत, तो पैसे देण्यास तयार असेल, तर या प्रकरणात बँक तुम्हाला 7 दिवसांच्या आत पैसे परत करेल.
3) आता प्रश्न येतो की, पैसे ज्या व्यक्तीला पाठवले गेले आहेत, त्याने पैसे देण्यास नकार दिला तर? जर तुमच्या मनात हाच प्रश्न येत असेल तर, अशा परिस्थितीत तुम्ही प्राप्तकर्त्याविरुद्ध एफआयआर नोंदवून कायदेशीररित्या तुमचे पैसे काढू शकता.