Ramdas Athawale | देश तोडण्याचे आणि लुटण्याचे काँग्रेसचे मनसुबे उघड झालेत

Ramdas Athawale | काँग्रेसचे सल्लागार सेम पित्रोदा यांनी अमेरिकेचा वारसा कायदा काँग्रेस ने भारतात लागू करण्याचा काँग्रेस ल सल्ला दिला आहे.त्यानुसार सामान्य माणसाने मोठ्या कष्टाने कमवलेली संपत्ती त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या वारसांना न देता त्यातील 55 टक्के संपत्ती शासनाने ताब्यात घेण्याचा अमेरिकेचा कायदा भारतात राबविण्याचे काँग्रेसचे स्वप्न आम्ही कधी पूर्ण होऊ देणार नाही. देशवासीयांना लुटण्याचा काँग्रेसचा इरादा पित्रोदा यांनी उघड केला आहे. सत्तेत असताना भ्रष्टाचार करून देशाला लुटण्याचा आणि आता मृत्यूनंतर ही सामान्य माणसाची संपत्ती लुटण्याचा अजब अमेरिकी कायदा आपल्या देशात लागू करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या काँग्रेस च्या लूट बेछूट वृत्तीचा आम्ही तीव्र निषेध करतो.असे मत आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी केले.

दक्षिण गोव्याचे काँग्रेसचे उमेदवार कॅप्टन विरियटो फर्नांडिस यांनी गोव्यात भारतीय संविधान जबरदस्ती लागू आहे .त्यांना भारतीय संविधान लागू करू नका आणि त्यांना दुहेरी नागरिकत्व द्यावे ही केलेली मागणी देशात फूट पडणारी आहे.राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेतून भारत तोडो ची बीजे पेरली का? त्याचे परिणाम स्वरूप गोव्यात काँग्रेस उमेदवार संविधान विरोधी गरळ ओकत आहे. काहीही बरळत आहेत. आपल्या भारत देशाला एकच संविधान आहे. जगातील सर्वश्रेष्ठ संविधान आहे.मग गोव्याला भारतीय संविधान नको दुसरे संविधान पाहिजे ही काँग्रेस उमेदवारांची मागणी काँग्रेस चा संविधानविरोधी चेहरा उघड करीत आहे.असा आरोप रामदास आठवले यांनी केला.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Murlidhar Mohol | जेवढी मतदानाची टक्केवारी वाढेल, तेवढ्या महायुतीच्या जागा जास्त निवडून येतील – चंद्रकांत पाटील

Shirur LokSabha | “मी डमी नाही तर डॅडी उमेदवार आहे”, आढळराव पाटलांचे अमोल कोल्हेंचे प्रत्युत्तर

Sunetra Pawar | केंद्र व राज्य सरकारचा दुवा बनून समस्यांचं निराकरण करणार; सुनेत्रा पवार यांचे प्रतिपादन