शाहू, फुले, आंबेडकर यांच्या केवळ उच्चारापेक्षा त्यांचे विचार आचरणात आणा – चैतन्य महाराज वाडेकर

कागल – राजर्षी छत्रपती शाहू महाराज, म.ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावांचे केवळ जप करू नका. त्यांचे समस्त मानव जातीच्या उद्धाराचे विचार आचरणात आणा.असे आवाहन राष्ट्रीय युवा कीर्तनकार हभप चैतन्य महाराज वाडेकर (chaitanya maharaj wadekar) यांनी केले. येथे सहकारातील आदर्श व्यक्तिमत्व, शाहू साखर कारखान्याचे संस्थापक स्व.राजे विक्रमसिंहजी घाटगे यांच्या सातव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त आयोजित भव्य कीर्तन सोहळा कार्यक्रमावेळी ते बोलत होते.

राजे फाउंडेशन व राजमाता जिजाऊ महिला समिती यांच्या संयुक्त विद्यमाने येथील श्रीराम मंदिर समोरील खर्डेकर चौकात हा किर्तन (kirtan) सोहळा भाविकभक्तांच्या अलोट गर्दीत संप्पन झाला.

यावेळी हभप वाडेकर यांनी स्व. राजे विक्रमसिंहजी घाटगे यांनी दिल्लीतील अक्षरधामच्या धर्तीवर उभारलेल्या कागलमधील श्रीराम मंदिर येथे प्रभू श्रीरामांचे दर्शन घेतले. या उत्कृष्ट मंदिराच्या उभारणीबद्दल घाटगे परिवाराचे व समस्त कागलकरांचे कौतुक केले. व्यासपीठावर भगवान डोणे महाराज (वाघापूर),शाहू कारखान्याच्या अध्यक्षा श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे,राजे प्रवीणसिंह घाटगे, शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे,  नंदितादेवी घाटगे, राजे वीरेंद्रसिंह घाटगे, नवोदिता घाटगे,   श्रेयादेवी घाटगे, युवराज आर्यवीरराजे घाटगे यांची प्रमुख उपस्थिती होती.

ते पुढे म्हणले, माणसाला माणूस बनविणारे विद्यापीठ म्हणजे वारकरी सांप्रदाय होय. माणसे बदलली नाहीत त्यांची बुद्धी बदलली. बुद्धीचा बदल सकारात्मकतेकडे नेणे सर्वांचे कर्तव्य आहे. कीर्तनामध्ये समाजप्रबोधनाची मोठी ताकत आहे.त्यामुळे चांगल्या परिवर्तनासाठी किर्तन झाले पाहिजे.

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत कारखाना मानधनधारक पै,अनिल चव्हाण,निलेश हिरुगडे,किरण पाटील या पैलवानांनी सहभाग घेऊन घवघवीत यश संपादन केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शाहू कारखान्याचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे,संचालक वीरकुमार पाटील, सर्व संचालक,कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण, प्रकाश पाटील आदींसह शाहू ग्रुपमधील विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

 कागल राजकिय नव्हे सामाजिक विकासाचे विद्यापिठ

यावेळी राजे समरजितसिंह घाटगे म्हणाले, कागल (kagal) ही राजर्षी शाहूंची जन्मभूमी आहे. राजकीय विद्यापीठ असा उल्लेख केला जातो.पण तोअशा सामाजिक ,धार्मिक प्रबोधनात्मक उपक्रमांनी जातीभेदापलिकडील सामाजिक विकासाचे विद्यापीठ करायचे आहे.असा गौरवपूर्ण उल्लेख केला.चुकीला चुक म्हणत यापुढे कागलमध्ये अन्यायाला विरोध करण्याची ठाम भुमिका घेऊया.त्याला उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली.