Ambadas Danve | मी निष्ठावान शिवसैनिक, भाजपाच्या वाटेवर जाणार नाही; अंबादास दानवेंनी स्पष्ट केली भूमिका

Ambadas Danve | छत्रपती संभाजीनगर येथून चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांना शिवसेना उबाठा गटाकडून लोकसभेची उमेदवारी देण्यात आली. तेव्हापासून अंबादास दानवे नाराज असून ते भाजपाच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सुरू होत्या. मात्र आता खुद्द अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी या चर्चांवर पूर्णविराम लावला आहे.

शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये दानवे म्हणाले की, माझ्या भाजप प्रवेशाच्या वावड्या उठवण्यात आलेल्या आहेत. मी निष्ठावान शिवसैनिक आहे. माझ्या तीस वर्षांच्या निष्ठेला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. ज्या दिवशी खैरेंची उमेदवारी जाहीर झाली त्या दिवशी नाराजी असू शकते, रोज रोज नाराजी नसते.

शिवसेना-भाजपचे विचार जुळतात, कारण २५ वर्षे आम्ही एकत्रित काम केललं आहे. परंतु शिवसेनेचा वेगळा बाणा आहे, त्यानुसार आम्ही काम करत आहोत. उद्धव ठाकरेंचे हात बळकट करण्यासाठी मी काम करणार आहे, अशी भूमिका दानवेंनी स्पष्ट केली.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

शिवसेना शिंदे गटाने जाहीर केली उमेदवारांची पहिली यादी, पाहा कोणाला मिळालं तिकीट?

Nana Patole | लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी लोकसभा निवडणुकीत एकजुटीने लढण्याची गरज

Prakash Ambedkar | ‘वंचितच्या पाठीत खंजीर खुपसला’! आंबडेकरांचा संजय राऊतांवर हल्लाबोल