Prakash Ambedkar | ‘वंचितच्या पाठीत खंजीर खुपसला’! आंबडेकरांचा संजय राऊतांवर हल्लाबोल

लोकसभा निवडणूक २०२४ साठी महाविकास आघाडीने प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या वंचित बहुजन आघाडीला आपल्यासोबत येण्याची ऑफर दिली होती. मात्र वंचितला त्यांच्या मागणीप्रमाणे जागा न मिळाल्याने त्यांनी मविआत सामील न होण्याचा निर्णय घेतला. नुकतेच वंचितने स्वतंत्र्यपणे त्यांचे उमेदवारही जाहीर केले आहेत. यादरम्यान प्रकाश आंबेडकर मविआतील नेत्यांवर नाराज असल्याच्याही बातम्या आल्या होत्या. यावर प्रतिक्रिया देताना शिवसेना उबाठा गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आंबेडकरांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू असल्याचे वक्तव्य केले होते. राऊतांच्या या भूमिकेवर आता प्रकाश आंबेडकरांनी संताप व्यक्त करत जोरदार टीका केली आहे.

प्रकाश आंबडेकर (Prakash Ambedkar) यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ट्वीट करून संजय राऊतांवर टीका केली आहे. संजय, किती खोट बोलशील? तुम्ही तर सहकारी असून पाठीत खंजीर खुपसला, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी संजय राऊत यांच्यावर केली आहे.

तुमची आणि माझी मते सारखीच असतील तर तुम्ही आम्हाला बैठकीला का बोलावत नाही? फोर सीझन्स हॉटेलमध्ये 6 मार्चला झालेल्या बैठकीनंतर तुम्ही आमच्या कोणत्याही प्रतिनिधीला का बोलावले नाही? वंचितांना आमंत्रण न देता आजही सभा का घेत आहात? सहयोगी राहून तुम्ही पाठीवर वार केलेत! सिल्व्हर ओक्स येथील मीटिंगमध्ये तुम्हाला कसे वाटले हे आम्हाला माहीत आहे! अकोल्यात आमच्या विरोधात उमेदवार उभा केल्याचा मुद्दा तुम्ही उपस्थित केला हे खरे नाही का? तुम्ही कोणत्या प्रकारचे नाते निर्माण करत आहात? एकीकडे ते युतीचा आभास दाखवत आहेत तर दुसरीकडे आम्हाला पदरात पाडून घेण्याचे कारस्थान करत आहेत! हे तुमचे विचार आहेत!?, अशा कठोर शब्दांत प्रकाश आंबेडकरांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

पुणे तिथे काय उणे? पुण्यासाठी मोहोळ, धंगेकर, मोरे आले एकत्र

Prakash Ambedkar | वंचितला अजून पाठींबा दिलेला नाही, मनोज जरांगेंनी फेटाळला प्रकाश आंबेडकरांचा दावा

Mumbai LokSabha | मुंबईतील सहापैकी चार लोकसभा मतदारसंघ ठाकरे गटाकडे, कोणा कोणाला मिळालं तिकीट?