Kangana Ranaut | ‘आपण लावलेला जावईशोध हा..’; सरदार पटेल यांना इंग्रजी येत नव्हतं म्हणणाऱ्या कंगानाला विश्वास पाटलांनी सुनावलं

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) काही दिवसांपूर्वी गुजरातला स्टॅच्यू ऑफ युनिटीला भेट देण्यासाठी गेली होती. कंगनाने सरदार वल्लभभाई पटेल यांचे कौतुक करताना म्हटले होते की, स्टॅच्यू ऑफ युनिटीला भेट देणे माझ्यासाठी एक अतिशय रोमांचक अनुभव होता. सरदार वल्लभभाई पटेल हे भारताचे पहिले पंतप्रधान होते. त्यांची इंग्रजी फारशी चांगली नव्हती, म्हणून त्यांना त्यांची खुर्ची मिळाली नव्हती. आता कंगनाच्या या पोस्टबाबत लेखक विश्वास पाटील (vishwas patil) यांनी एक ट्वीट शेअर केलं आहे. त्यांच्या या ट्वीटनं अनेकांचे लक्ष वेधले.

विश्वास पाटील यांनी ट्वीटमध्ये लिहिलं, “कंगना (Kangana Ranaut) जी, सरदार वल्लभाई पटेल हे बॅरिस्टर होते ! लंडनला जाऊन त्यांनी बॅरिस्टरी पूर्ण केली होती. ते अहमदाबाद कोर्टातले एक लीडिंग फौजदारी वकील होते. त्यांचे इंग्रजीवर इतके प्रभुत्व आणि मास्टरी होती की, अनेक ब्रिटिश जज त्यांचा कोर्टामधला प्रतिवाद ऐकण्यासाठी उत्सुक असायचे. तेच नव्हे तर त्यांचे थोरले बंधू विठ्ठलभाई पटेल हे सुद्धा बॅरिस्टर होते. ते सुद्धा निष्णात वकील होते. या दोघा भावांचे इंग्रजीवरील असामान्य प्रभुत्व आणि त्यांची व्याख्याने याबद्दल इतिहासामध्ये अनेक दंतकथा व सत्यकथा प्रचलित आहेत. त्यामुळे वल्लभाईंना इंग्रजी येत नव्हते असा आपण लावलेला जावईशोध हा आपल्या अज्ञानाचा भाग समजायचा का ?”

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

शिवसेना शिंदे गटाने जाहीर केली उमेदवारांची पहिली यादी, पाहा कोणाला मिळालं तिकीट?

Nana Patole | लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी लोकसभा निवडणुकीत एकजुटीने लढण्याची गरज

Prakash Ambedkar | ‘वंचितच्या पाठीत खंजीर खुपसला’! आंबडेकरांचा संजय राऊतांवर हल्लाबोल