Mitchell Starc | स्टार्कवर खर्च केलेले 24.75 कोटी पाण्यात! आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागड्या गोलंदाजाला कोहलीने धू धू धुतले

Virat Kohli vs Mitchell Starc | जेव्हा केकेआरने आयपीएल 2024 मिनी लिलावात मिशेल स्टार्कवर मोठी बोली लावली तेव्हा प्रत्येकाला अशी आशा होती की या हंगामात ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज चांगली कामगिरी करेल. मात्र आतापर्यंत खेळल्या गेलेल्या दोन सामन्यांमध्ये ते अगदी उलट असल्याचे दिसून आले आहे.

सनरायझर्स हैदराबादविरूद्ध भरपूर धावा लुटणाऱ्या स्टार्कने चिन्नास्वामीमध्येही सर्वात महागडे षटके टाकली. विराट कोहलीने स्टार्कविरुद्ध धावांचा पाऊस पाडला. 24.75 कोटींना विकत घेतलेला स्टार्क आरसीबी विरूद्ध विकेट देखील मिळवू शकला नाही.

मिशेल स्टार्कने (Mitchell Starc) सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध 4 षटकांत 53 धावा दिल्या होत्या. पहिल्या सामन्यात जेव्हा स्टार्कने इतकी वाईट कामगिरी केली, तेव्हा प्रत्येकाला असे वाटले की कांगारू गोलंदाज दुसर्‍या सामन्यात जोरदार पुनरागमन करेल. तथापि, असे काहीही झाले नाही. आरसीबीविरद्धही स्टार्क फलंदाजांचा जोरदार मार खाताना दिसला. स्टार्कने 4 षटकांत 47 धावा दिल्या. म्हणजेच, प्रत्येक षटकात सुमारे 12 धावा.

विराट कोहलीने विशेषत: मिशेल स्टार्कला लक्ष्य केले. सामन्याच्या पहिल्या बॉलवर विराटने स्टार्कचे चौकारांसह स्वागत केले. यानंतर, पुढच्या षटकात कोहलीने केकेआरच्या वेगवान गोलंदाजीविरुद्ध चौकार आणि षटकार ठोकले. या सामन्यात स्टार्कने कोहलीला 16 चेंडू टाकले, ज्यात कोहलीने 33 धावा फटकावल्या. म्हणजे किंग कोहलीने 200 पेक्षा जास्त स्ट्राइक रेटवर स्टार्कच्या विरूद्ध धावा केल्या.

विराट कोहलीचे पुन्हा अर्धशतक
विराट कोहलीने केवळ स्टार्कच नव्हे तर प्रत्येक केकेआर गोलंदाजाचाही समाचार घेतला. कोहलीने मोठमोठे फटके मारताना केवळ 36 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. विराटला 59 बॉलचा सामना करावा लागला आणि 83 धावांचा वेगवान डाव खेळला. या दरम्यान, 4 चौकार आणि 4 गगनचुंबी षटकार त्याच्या फलंदाजीमधून बाहेर आली. कोहली व्यतिरिक्त, कॅमेरून ग्रीनने 21 चेंडूंनी 33 धावा केल्या, तर मॅक्सवेलने 28 धावा केल्या. अंतिम षटकांत दिनेश कार्तिकने 8 चेंडूंच्या 20 धावा केल्या आणि आरसीबीने एकूण 182 धावा फलकावर लावल्या.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

शिवसेना शिंदे गटाने जाहीर केली उमेदवारांची पहिली यादी, पाहा कोणाला मिळालं तिकीट?

Nana Patole | लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी लोकसभा निवडणुकीत एकजुटीने लढण्याची गरज

Prakash Ambedkar | ‘वंचितच्या पाठीत खंजीर खुपसला’! आंबडेकरांचा संजय राऊतांवर हल्लाबोल