शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी छातीठोकपणे सांगितलं, होय! मी शरद पवारांचा माणूस

मुंबई: दोन दिवसांपूर्वी ईडीने (ED) संजय राऊत यांच्या संपत्तीवर टाच आणली. यावेळी संजय राऊत अधिवेशनासाठी दिल्लीत होते. ते काल (७ एप्रिलला) परत मुंबईत आले आहे. त्यांचं शिवसेनेकडून जल्लोषी स्वागत करण्यात आले होतं. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.मी शरद पवारांचा (sharad pawar)  माणूस आहे, हे जगजाहीर आहे, यात काही लपवण्यासारखं नाही असं वक्तव्य संजय राऊतांनी केलं.

संजय राऊत (sanjay raut) यांच्यावर झालेल्या कारवाईनंतर शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीला गेले होते. त्या भेटीवरुन चंद्रकांत पाटील यांनी निशाणा साधला होता. शिवसेना खासदार संजय राऊत हे पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे किंवा शिवसेनेचे नव्हेत तर प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे समर्थक आहेत, असा टोला चंद्रकांत पाटील (chandrkant patil) यांनी लगावला होता. याला संजय राऊत यांनी उत्तर दिले आहे.

मी शिवसेनेमध्ये (shivsena) असताना शरद पवार यांच्यासोबतचे प्रेमाचे संबंध होते, त्यामुळेच आम्ही सत्ता स्थापन करु शकलो, असं संजय राऊत म्हणाले. तुमची मती भ्रष्ट झाली आहे हे माहिती आहे. पण तुमची मती इतकी भ्रष्ट झाली तर राज्यातील जनतेला तुमच्या एकंदरीत मानसिक आरोग्याविषयी शंका आहे, असा खोचक टोलाही संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटलांना लगावला आहे.