Nilesh Lanke | “मला गजा मारणेची पार्श्वभूमी माहिती नव्हती, ती भेट अपघात”; निलेश लंकेंचे स्पष्टीकरण

Nilesh Lanke Meets Gaja Marne |अहिल्यानगरचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके (Nilesh Lanke) सध्या पुणे दौऱ्यावर आहेत, यादरम्यान गुरुवारी लंके यांनी पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणे यांच्या घरी जाऊन त्याची भेट घेतली व सत्कारही स्वीकारला. लंकेंच्या या भेटीवरुन त्यांच्यावर चौफेर टीका होत आहे. दरम्यान आता निलेश लंके यांनी याप्रकरणावरुन माफी मागितली आहे.

गजा मारणेसोबतच्या भेटीवर स्पष्टीकरण देताना निलेश लंके म्हणाले, “मी दिल्लीवरुन आलो. माझे पवार नावाचे सहकारी होते. त्यांचे कर्करोगाच्या आजाराने निधन झाले. त्यांच्या नातेवाईकांची भेट झाल्यानंतर आम्ही परत निघालो. त्यावेळी त्या भागातील आमचा राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी प्रविण धनवे यांच्या घरी गेलो. त्याच्या घरुन निघाल्यानंतर मारणे यांच्या घराजवळ आम्हाला चार सहा लोकांनी थांबवले. त्यांनी चहा पिण्यासाठी बोलवले. आम्हाला तोपर्यंत कोणाची काहीच पार्श्वभूमी माहीत नव्हती. त्यावेळी माझा सत्कार करण्यात आला. तोपर्यंत गजानन मारणे कोण हे मला माहीत नव्हते. नंतर दोन तासांनी संबंधित व्यक्ती माहिती कळाली. तो एक अपघात होतो. कळत न कळत चूक झाली”, असे त्यांनी सांगितले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप