सैफ आतासुद्धा चाळीशीतच आहे असं वाटतं, तो आणखी हॉट दिसू लागलाय; करीना कपूरचं वक्तव्य

Kareena Kapoor Khan: बॉलीवूड स्टार कपल करीना कपूर खान आणि सैफ अली खान (Saif Ali Khan) यांना फिल्म इंडस्ट्रीतील सर्वात चर्चेचा विषय म्हटले तर यात काही शंका नाही. दोघेही त्यांच्या प्रोफेशनल लाइफसोबतच वैयक्तिक आयुष्याबाबतही अनेकदा चर्चेत असतात. करीना आणि सैफ यांच्यात जवळपास १० वर्षांचे अंतर आहे. वयातील या अंतरामुळे नेहमी करीना प्रश्न केले जातात. आता करीना यावर हटके उत्तर दिले आहे.

करीनाने २०१२ साली आपल्याहून १० वर्षांनी मोठा असलेल्या सैफसोबत विवाह केला. दोघांमध्ये वयाचे मोठे अंतर असल्याने बऱ्याचदा करीनाला अनेकांनी सल्लेही दिले. मात्र करीनासाठी सैफ आजही तितकाच फिट आणि गुडलूकिंग आहे, जितका वयाच्या चाळीशीत होता.

याबाबत बोलताना करीना म्हणाली, सैफच्या फिटनेसकडे बघून कोणाचाही विश्वास बसणार नाही की, तो आजही ५३ वर्षांचा आहे. आतासुद्धा तो चाळीशीत आहे असंच वाटतं. तो दिवसेंदिवस आणखी हॉट दिसू लागला आहे. मला आनंद आहे की मी त्याच्यापेक्षा लहान आहे.

https://youtu.be/igs_KEHGv_g?si=93eBUKyMvxt2A_6b

महत्त्वाच्या बातम्या-

भारतीय सैनिक अरुणाचल प्रदेश व पंजाबसह सीमावर्ती भागात करणार ‘दगडूशेठ’ गणपतीची प्रतिष्ठापना

Rahul Gandhi की Arvind Kejriwal! 2024 साठी विरोधकांचा चेहरा कोण?

Loksabha Election : पुणे लोकसभेच्या भाजपा समन्वयकपदी श्रीनाथ भिमाले !