वडिलांचा समृद्ध वारसा असाच पुढे नेण्याचा प्रयत्न करेन! आ. सत्यजीत तांबेंनी व्यक्त केली भावना

Satyajeet Tambe: यंदाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात आमदार सत्यजीत तांबेंना पहिल्यांदा जनतेचे प्रश्न मांडण्याची संधी मिळाली. हिवाळी अधिवेशनात आ. तांबेंनी अधिवेशनात १०० टक्के हजेरी लावत जनतेचे विविध प्रश्न मांडले. यात तारांकित प्रश्न, लक्षवेधी सुचना, औचित्याचे मुद्दे, विशेष उल्लेख इत्यादी प्रश्न सभागृहात उपस्थित केले. शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, कंत्राटी कामगार, पत्रकार, रोजगार व उद्योगधंदे इत्यादी प्रश्न उपस्थित करून सरकारचे लक्ष वेधले. यापैकी बऱ्याच प्रश्नांना मंत्र्यांकडून सकारात्मक उत्तर मिळाली आणि काही मागण्या व प्रश्न मार्गी लावण्यात यश आले. वडिलांचा समृद्ध वारसा असाच पुढे नेण्याचा प्रयत्न करेन, असेही आ. तांबेंनी स्पष्ट केले. हिवाळी अधिवेशन काळातील कामाचा लेखाजोखा जनतेसमोर मांडण्यासाठी आ. सत्यजीत तांबेंनी सोशल मीडियाच्या व्यासपीठावरून इतंभूत माहिती दिली.

आमदार सत्यजीत तांबे म्हणाले की, देशात व राज्यात बेरोजगारांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. सिन्नर येथील इंडिया बुल्सची जमीन सरकारने ताब्यात घ्यावी. आणि तिथे उद्योगधंदे सुरू करून रोजगार निर्मिती करावी. जवळपास २ ते ३ लाख रोजगार निर्माण होऊ शकते. गडचिरोली जिल्हा हा दारूबंदी असलेला जिल्हा आहे. तिथे दारू निर्मितीचा कारखाना सुरू न करता दुसऱ्या जिल्ह्यात इतर कारखाने सुरू करण्याची मागणी केली. तसेच नंदूरबारमध्ये एमआयडीसी सुरू करून तिथल्या तरुणांना रोजगार निर्मिती करून द्यावी. याशिवाय, राज्यातील कंत्राटी कामगारांच्या मागण्या, शिक्षक व विद्यार्थ्यांच्या मागण्या, आरोग्य विषयक मागण्या तसेच ब्लॅकलिस्टवरील रुग्णालयांची यादी इत्यादी प्रश्नांवर प्रकाश टाकला, अशी माहिती आ. तांबेंनी दिली.

प्रामुख्याने पत्रकारांच्या मागण्या, जुनी पेन्शन योजना यांच्यावर येणाऱ्या काळात सकारात्मक निर्णय घेतले जाणार आहेत. तसेच निवृत्तीचे वय वाढवले तर नवीन तरुणांना संधी मिळणार नाही. त्यामुळे निवृत्तीचे वय वाढवून देण्याच्या मागणीला विरोध आहे. अहमदनगर, जळगाव जिल्हा व इतर जिल्ह्यातील शिक्षकांचा पगार त्यांच्या पसंतीच्या बँकेत जमा व्हावा, तसेच पसंतीच्या बँकेत खाते उघडता यावे. त्यावर सरकारने दखल घेत शासन निर्णय जारी केला. होमिओपॅथिक डॉक्टरांना सरकारी नोकरीमध्ये संधी मिळावी. तसेच समृध्दी महामार्गावरील अपघातांचा प्रश्न मांडला. नाशिक व नंदूरबार जिल्ह्यातील एमआयडीसीचा मुद्दा उपस्थित केला. डोळासणे व वावी येथे ट्रॉमा केअर सेंटर उभारावे. याशिवाय, ग्रामीण रुग्णालयांच्या बांधकामाचे प्रश्न उपस्थित केला, अशी ही माहिती आ. सत्यजीत तांबेंनी दिली.

वैधानिक दृष्ट्या टिकेल, असे आरक्षण द्या!
मराठा, धनगर, मुस्लीम समाजामधून आरक्षणाच्या मागण्या येत आहेत. सरकारने सगळ्या मागण्यांचा विचार करून कोणत्याही इतर जातीला व प्रवर्गाला धक्का न लावता, आणि वैधानिक दृष्ट्या टिकेल, असे आरक्षण दिले पाहिजे. सगळ्या जाती व धर्मातील लोकांना आरक्षण मिळाले पाहिजे.

आयटी महाविद्यालयांसाठी १४०० कोटी मंजूर
उत्तर महाराष्ट्रातील ६८ शासकीय आयटी महाविद्यालयामध्ये नवीन तंत्रज्ञान कसे आणता येईल, यावर कौशल्य, रोजगार, उद्योजक व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या सोबत चर्चा झाली. आयटी महाविद्यालयात तांत्रिक गोष्टींसाठी १४०० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे.

युथ इनोव्हेशन सेंटरचे काम सुरू
उत्तर महाराष्ट्रासाठी एक महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे ‘युथ इनोव्हेशन सेंटर.’ यावर १२ जानेवारी २०२४ रोजी फेसबूक लाईव्हवर सविस्तर चर्चा केली जाणार आहे. अनोखा प्रकल्प हा उत्तर महाराष्ट्रात सुरू झालेला आहे. पाच जिल्ह्यांमध्ये त्याचं बांधकाम सुरू झाले आहे. किमान ३०० ठिकाणी सब सेंटर देखील उत्तर महाराष्ट्रात सुरू करणार आहोत.

महत्वाच्या बातम्या-

विरोधकांना जनता ४४० व्होल्टचा करंट लावणार; चंद्रशेखर बावनकुळे यांचा विश्वास

रामदास आठवले यांनी तळागाळातील वंचित घटकांसाठी केलेले कार्य प्रेरक आहे – देवधर

मला या स्थितीत आणण्यासाठी खूप धन्यवाद..; कुस्तीपटू विनेश फोगटने पद्मश्री आणि अर्जुन पुरस्कार केले परत