‘वंचित’ महाविकास आघाडीत जाणार? प्रकाश आंबेडकर आणि शरद पवार यांची मुंबईत भेट

Mumbai- नुकतीच वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांची मुंबईत भेट घेतली आहे. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये प्रकाश आंबेडकर आणि शरद पवार यांची भेट झाली. या भेटीनंतर वंचित बहुजन आघाडी पक्ष महाविकास आघाडीत सामील होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

अलीकडेच वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना ठाकरे गटाची युती झाली आहे. या युतीनंतर वंचित आघाडी महाविकास आघाडीचा भाग बनेल का असा प्रश्न उपस्थित झाला होता. यानंतर आता प्रकाश आंबेडकरांनी शरद पवारांची भेट घेतल्याने या चर्चांनी जोर धरला आहे. दरम्यान या भेटीत आंबेडकर आणि पवार यांच्यात कोणत्या विषयावर चर्चा झाली हे अद्याप समजलेले नाही.