महाविकास आघाडीच्या विजयाने जिल्ह्यात नव्या राजकीय समीकरणांची नांदी ?

उस्मानाबाद – उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकला आहे. उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १५ संचालकासाठी  झालेल्या निवडणुकीत भाजपाचे आ .राणाजगजितसिंह पाटील यांच्या पँनलचा पराभव करुन  महाविकासआघाडीने पंधरा पैकी पंधरा जागा जिंकुन भाजपाचा सुफडा साफ केला. या विजयामुळे जिल्हयात नव्या राजकिय समीकरणांची सुरुवात झाल्याचे राजकीय पटलावर बोलले जात आहे.

या निवडणुकीत मतदानापुर्वीच महाविकास आघाडीचे ५ संचालक बिनविरोध निवडुन आले होते. उरवरीत १० जागेसाठी भाजपा विरूद्ध कॉग्रेस -राष्ट्रवादी -शिवसेना महाविकास आघाडी अशी झाली. या चुरशीच्या निवडणुकीत भाजपाचा सुपडा साफ झाला असुन सर्व १५ संचालक महाविकास आघाडीचे विजयी झाले आहेत.

महाविकास आघाडीला मिळालेल्या या यशाने पुढील जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपरिषद निवडणुका याच फाँर्म्युल्याने लढण्याची  राजकीय पटलावर चर्चा चविष्टतेने चर्चिली जात आहे. काही ठिकाणी आतापासुन महाविकासआघाडी माध्यमातून लढण्यासाठी व्युहुरचना आखण्यास सुरु झाली आहे.त्यामुळे जिल्हयात यापुढे भाजपला महाविकासआघाडीचे मोठे आव्हान पुढे असणार आहे.