रामदास आठवले यांनी तळागाळातील वंचित घटकांसाठी केलेले कार्य प्रेरक आहे – देवधर

Sunil Deodhar : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले) राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे शहर रिपब्लिकन पक्षाच्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शहर कार्यालयात केक कापून कार्यकर्त्यांनी वाढदिवस साजरा केला. शहर कार्यकारिणीच्या वतीने आठवले यांच्यावर शुभेच्छा वर्षाव झाला. केक वाटप व स्नेहभोजन करून ‘रिपाइं’ पुणे शहराच्या वतीने आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे महासचिव सुनील देवधर यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. ‘रिपाइं’ पक्ष कार्यालयात आयोजित स्नेहमेळाव्यात अध्यक्षस्थानी शहराध्यक्ष संजय सोनवणे, तर स्वागताध्यक्षपदी यंशवत नडगम होते. ‘रिपाइं’चे राज्य सचिव बाळासाहेब जानराव, माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, पश्चिम महाराष्ट्र युवक आघाडीचे अध्यक्ष परशुराम वाडेकर, संपर्कप्रमुख अशोक कांबळे, अशोक शिरोळे, निलेश आल्हाट, श्याम सदाफुले, वीरेन साठे, ऍड. अर्चित जोशी, महादेव दंदी, भाजपचे शहर सरचिटणीस संदीप लोणकर, दीपक माने, आर. जी. गायकवाड, सप्तफुला दंदी, सुरज दंदी, वर्षा दंदी, विशाल गायकवाड, किशोर समिंदर, संजय पटणपल्लू, विनोद टोपे, शमशुद्दीन शेख, फिरोज खान, सुरज जाधव, मिनाज मेमन, मिनाताई गालटे, चांदणी गायकवाड, चिंतामन जगाताप, गणेश जगताप, वसंत ओव्हाळ, राजेश गाढे, तिरुपती मेडिबोयना, तानाजी गायकवाड, जितेश दामोदरे, सुभाष शिंदे, भारत भोसले व अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुंढवा येथील बौद्ध विहारामध्ये महिलांना साड्या वाटप, हडपसर येथे ब्लॅंकेट वाटप करण्यात आले, महाराष्ट्र हौसिंग बोर्ड येथे शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन केले होते. विमाननगर, उबाळेनगर, खांदवेनगर, वाघोली, घोरपडी, काळूबाई चौक, गोळीबार मैदान, हडपसर याठिकाणी पक्षाच्या शाखा फलकांचे अनावरण करण्यात आले. शहराच्या काही भागात रक्तदान शिबीर, लाडू व केकचे वाटप, गरजूना धान्य वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला. काही ठिकाणी ख्रिश्चन कुटुंबियांना केक वाटप करून व बाळमेळावा करून आठवले यांचा वाढदिवस साजरा केला.

सुनील देवधर म्हणाले, “रामदास आठवले आंबेडकरी चळवळीतील महत्वाचे नेते आहेत. ‘रिपाइं’च्या माध्यमातून त्यांनी तळागाळातील वंचित घटकांसाठी केलेले कार्य प्रेरक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी खास जवळीक असलेल्या नेत्यांपैकी आठवले एक आहेत. भारतीय जनता पार्टी आणि रिपाइं यांच्या युतीमुळे देशातील सर्वच दलित, वंचित, अल्पसंख्य घटकांना न्याय देण्याचे काम होत आहे. आठवले साहेबांचा वाढदिवस म्हणजे कार्यकर्त्यांसाठी उत्सव असून, विधायक उपक्रमांतून तो साजरा केला जात आहे, याचा आनंद वाटतो.”

महत्वाच्या बातम्या-

ठाकरेंनी कोरड्या विहिरीत उडी मारायला लावली तरी मारेन; लोकसभेबाबत अंबादास दानवे स्पष्टच बोलले

शेअर मार्केटमध्ये महिन्याभरात कमावले ६५० कोटी, ‘या’ महिलेची अविश्वसनीय कामगिरी

40 लाखांची साडी आणि 100 कोटींची कार, असे आहे Neeta Ambani यांचे विलासी जीवन