मी शिक्षण मंत्री असतो तर आज विद्यार्थ्यांवर ही वेळच आली नसती – हिंदुस्थानी भाऊ

मुंबई – बिग बॉसच्या माजी स्पर्धक आणि सोशल मीडियावर हिंदुस्तानी भाऊ म्हणून प्रसिद्ध असलेला विकास पाठकने (Vikas Pathak in Students agitation) सोशल मीडियावर आंदोलनात विद्यार्थ्यांना सहभागी होण्याचे आवाहन केले होते. त्याच्या आवाहनाला प्रतिसाद देत शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या घरासमोर मोठ्या प्रमाणात विद्यार्थी जमले होते.

दरम्यान, विकास पाठक (हिंदुस्तानी भाऊ) विद्यार्थ्याच्या आंदोलनात देखील सहभागी (Hindusthani Bhau in Students Agitation) झाला होता. दहावी आणि बारावीच्या ऑफलाईन परीक्षांविरोधात करण्यासाठी विद्यार्थ्याकडून आज राज्यभरात मोठ्या प्रमाणात (Students Agitation for online exam) आंदोलन करण्यात आले आहे. मात्र, या आंदोलनाला यशस्वी करण्याचे काम हिंदुस्तानी भाऊने (Hindusthani Bhau viral video) केले आहे.

आज रस्त्यावर उतरलेल्या विद्यार्थांची जबाबदारी मी का घेऊ असा सवाल हिंदुस्थानी भाऊने केला आहे. आज विद्यार्थी आंदोलन करतायत ही जबाबदारी राज्य सरकारची आहे असंही हिंदुस्थानी भाऊने सांगितलं.गेल्या तीन महिन्यांपासून दहावी-बारावीचे विद्यार्थी डिप्रेशनमध्ये होते, अनेकांनी जीव देण्याची इच्छा व्यक्त केली, त्यामुळेच रस्त्यावर उतरून आंदोलन करावं असं आपण आवाहन केल्याचं त्याने म्हटलं आहे. मी शिक्षण मंत्री असतो तर आज विद्यार्थ्यांवर ही वेळच आली नसती असं हिंदुस्थानी भाऊने सांगितलं.